AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | भाजप आमदाराचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, हायकमांड नेमकं कोण?

कधी सोबत घ्यायचं आणि कुणाला कधी सोडायचं हे भाजपला नेतृत्वाला ठाऊक असल्याचं ते म्हणालेयत. शिवाय सध्याच्या सरकारमध्ये हायकमांड कोण यावरुन दावे सुरु झालेयत.

Video : टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट |  भाजप आमदाराचं 'ते' वक्तव्य चर्चेत, हायकमांड नेमकं कोण?
| Updated on: Jul 17, 2023 | 12:05 AM
Share

मुंबई : सध्याच्या राजकारणावर फडणवीसांनी महाभारताचा दाखला देत धर्म आणि अधर्मातला फरक सांगितला होता. त्यानंतर आता भाजपचे आमदार जयकुमार गोरेंच्या विधानानं भुवया उंचावल्यायत कुणाला कधी सोबत घ्यायचं आणि कुणाला कधी सोडायचं हे भाजपला नेतृत्वाला ठाऊक असल्याचं ते म्हणालेयत. शिवाय सध्याच्या सरकारमध्ये हायकमांड कोण यावरुन दावे सुरु झालेयत.

कुणाला कधी सोबत घ्यायचंय, किती दिवस सोबत ठेवायचंय आणि कुणाला कधी सोडायचं. हे भाजपच्या नेतृत्वाला माहिती आहे, असं विधान करुन भाजप आमदारानं नव्या वादाला सुरुवात केलीय. एकीकडे सरकार म्हणतंय की अजित पवारांच्या येण्यानं डबल इंजिन सरकार गतिमान होणाराय. मात्र दुसरीकडे त्याच ३ पक्षांच्या युतीवर भाजपचेच आमदार अप्रत्यक्षपणे शंका उभी करतायत.

पाहा व्हिडीओ:-

जयकुमार गोरे हे भाजपचे माण-खटावमधले आमदार आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात भाजपची बैठक होती. उदयनराजे भोसलेंसह भाजपचे पदाधिकारी हजर होते. त्याच बैठकीत जयकुमार गोरेंच्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. भाजप आमदारांच्या या विधानानं वाद उद्भवल्यानंतर मात्र सरकारमधल्या नेत्यांनी सारवासारव सुरु केलीय.

भाजपचे जयकुमार गोरे म्हणतायत की महाराष्ट्र सरकारचे हायकमांड फडणवीस आहेत. तर संजय शिरसाटांच्या दाव्यानुसार सरकारचे हायकमांड हे एकनाथ शिंदेच आहेत.अजित पवार गटानं अद्याप हायकमांडच्या वादावर प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्याच्या युत्या-आघाड्यांमध्ये अडचण ही विचारधारा आणि पारंपरिक व्होटबँकेची झालीय.

ज्या शिंदे गटानं अजित पवारांमुळे सरकार पाडलं, तेच त्यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री झालेत. ज्या भाजप नेत्यांनी अजित पवारांसह अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनाच भाजप मंत्री करुन सोबत घेतलंय आणि ज्या राष्ट्रवादीनं भाजपच्या हिंदुत्वाला विभाजनवादी म्हटलं., ते सुद्धा फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानं सत्तेत बसलेयत. या विसंगतीचा मेसेज खालपर्यंत जाऊ नये, म्हणूनच तिन्ही सत्ताधारी पक्षांनी भूमिका पटवून देण्याचं काम सुरु केलंय.

आम्ही भाजपसोबत आहोत, मात्र भाजपमध्ये गेलेलो नाही., हे अजित पवार गटाचे नेते वारंवार सांगतायत. नव्या सत्ताकारणावरुन फडणवीसांनी महाभारतातल्या कुटनीतीचा दाखला दिलाय. हलहल विष पचवायचा नाही कडू औषध घ्यायची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे मोठं मंथन सध्या सुरू आहे …..सध्या आश्यकता संयमाची आपल्याला हवी आहे. दूरचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण जे करतोय तो अधर्म नाही हे धर्म आहे, करणाचे कवचकुडल काढून घेतल्याशिवाय विजय भीष्माला पराभव करण्यासाठी शिखंजीला उतरवलं.

दुसरीकडे सत्तेत गेल्यानंतर विचारधारांचं काय हे पटवून देताना अमोल मिटकरींनाही इतिहासातली उदाहरणं द्यावी लागतायत. तूर्तास या साऱ्या प्रतिक्रियांच्या वादात सत्तेत गेलेला अजित पवार गट मात्र कमालीचा मौन आहे. जेव्हा भारत गोगावलेंनी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्या मंत्रिपदावरुन महिला-पुरुष भेदाचा दाखला दिला. तेव्हा आंदोलन शरद पवारांच्या गटानं केलं. सदाभाऊ खोतांनी शरद पवारांचा सैतान उल्लेख केल्यानंतर शरद पवार गटानंच आंदोलन केलं.मात्र अजित पवार गटातल्या बड्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही आणि आता कुणाला कधी घ्यायचं आणि कधी सोडायचं असं भाजप आमदारानं म्हटल्यानंतरही अजित पवार गटाचे बडे नेते मौन आहेत.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.