AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray LIVE | मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे

गोरेगावमधील एग्झिबिशन मैदान, वरळीमध्ये कोरोना ग्रस्तांसाठी आणि क्वारंटाईन करण्यात आलेल्यांसाठी सुविधा करण्यात आली आहे

CM Uddhav Thackeray LIVE | मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 26, 2020 | 3:07 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना विषाणू दिवसेंदिवस आपले पाय पसरवत आहे (Uddhav Thackeray On Corona). कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या राज्यात 7 हजार 628 कोरोना रुग्ण आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून राज्यातील (Uddhav Thackeray On Corona) जनतेशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनासंबंधी राज्यातील स्थिती स्पष्ट केली. तसेच, त्यावर कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, प्रशासनाची काय तयारी आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लाईव्ह प्रसारणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

– जगभरात एकच चर्चा, भारत हे युद्ध औषध येण्यापूर्वी जिंकेल, ते हिमतीवर, धैर्यावर, मनोबलावर हे युद्ध जिंकेल असा सर्वांचा आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास असेल तर समोर संकटांचा पहाड जरी असला तरी तो आपण जमीन दोस्त करु शकतोतेवढा आत्मविश्वास आपल्यात आहे, आत्मविश्वाच्या बळावर आपण हे युद्ध जिंकू शकतो जेवढी खबरदारी आपण घेता आहात ती अतुलनीय आहे. जो संयम दाखवता तो अद्भ्ुत आहे. हे तुम्ही दाखवत आहात म्हणून आम्ही हे युद्ध लढू शकतो

– गोरेगावमधील एग्झिबिशन मैदान, वरळीमध्ये कोरोना ग्रस्तांसाठी आणि क्वारंटाईन करण्यात आलेल्यांसाठी सुविधा, कोरोनाची लक्षणं दिसली तर फिव्हर क्लिनिकमध्ये जा, घरच्या घरी उपचार करु नका, अंगावर काढलं तर विषाणू रौद्र रुप धारण करेल, कोरोनावर औषध नसलं, तरी काळजी घेतल्यास बरा होतो

– 3 मेच्या पुढे मुंबईत शिथिलता आणताच रहदारी-वर्दळ वाढली, कोरोना विषाणूच्या वाढीचा वेग कमी झाला तरी गाफील राहू नका, ही संयमाची परीक्षा, सुदैवाने 80 टक्के रुग्णांना लक्षणं नाहीत

– केंद्राचं पथक मुंबई आणि पुण्यात, त्रयस्थपणे सूचना करण्याचं आवाहन, दोन दिवसापासून केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्यवाटप

– महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु, पण इतक्यात ट्रेन सुटणार नाही, गर्दी करायची नाही, संयमाने घेण्याची गरज, अन्यथा तपस्चर्या वाया जाईल (Uddhav Thackeray On Corona)

नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले, सर्व जण धर्म, जात विसरुन एकत्र आले, यात आपल्याला राजकारण बाजूला ठेवायला हवं, त्यामुळे मला गडकरींना धन्यवाद द्यायचे आहे, काही जण राजकारण करत आहे, मात्र तुम्ही जो सल्ला दिला आहे, की ही राजकारणाची वेळ नाही, सर्व एकत्र येऊन सरकारला सहकार्य आहे, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो

– लॉकडाऊनमुळे कोरोनाचा गुणाकार रोखण्यात आपल्याला यश आलं, ती वाढ आपण नक्कीच काही प्रमाणात आटोक्यात आणली

– दोन पोलीस कोन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला, कोरोनाशी लढताना ते शहीद झाले, पोलीस कॉन्सटेबला मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, तसेच पोलीस काय करतात हे प्रत्येक वेळा म्हटलं जातं. पोलीसांवर संशय व्यक्त करणे योग्य नाही, असं ही ते म्हणाले

– देव मंदिरात नाही, आपल्यासोबत आहे, डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यात देव आहे. चित्रपटात देव मदत करतो पण त्याप्रकारे आता खरचं या रुपाने देव मदत करत आहे

– हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती सर्वधर्मीय बांधवांनी आपापले सण-उत्सव पुढे ढकलले, राष्ट्रसेवेला प्राधान्य दिलं, मानवताधर्म निवडला, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले (Uddhav Thackeray On Corona)

संबंधित बातम्या :

परराज्यातील मजुरांना नक्की घरी पाठवू, पण ट्रेन सुरु करणार नाही : मुख्यमंत्री

‘या’ आवाहनाबद्दल उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींचे जाहीर आभार मानले!

CM Udhhav Thackeray | डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, पोलीस यांच्या रुपाने देव आपल्याला मदत करत आहे : मुख्यमंत्री

मला देशातील प्रत्येक नागरिकाचा अभिमान, कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व प्रत्येकाकडे : पंतप्रधान मोदी

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा