AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला देशातील प्रत्येक नागरिकाचा अभिमान, कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व प्रत्येकाकडे : पंतप्रधान मोदी

देशातील सर्व नागरिक या लढाईचे नेतृत्व करत आहे. आज पूर्ण देश एकाच लक्ष्यावर चालला आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Corona Mann ki Baat) यावेळी म्हणाले. 

मला देशातील प्रत्येक नागरिकाचा अभिमान, कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व प्रत्येकाकडे : पंतप्रधान मोदी
| Updated on: Apr 26, 2020 | 12:41 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (26 एप्रिल) सकाळी 11 वाजता मन की बात या (PM Narendra Modi Corona Mann ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. येत्या 3 मे रोजी हा लॉकडाऊन संपणार आहे. त्यामुळे सर्व जनतेचे पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. 

“भारतातील कोरोनाविरोधातील लढा हा जनताकेंद्री आहे. देशात महायज्ञ सुरु (PM Narendra Modi Corona Mann ki Baat) असल्याची स्थिती दिसत आहे. प्रत्येक जण आपल्या सामर्थ्य ओळखून लढा देत आहे. भारतासारखा मोठा देश कोरोनाविरुद्ध निर्णायक लढाई लढत आहे. देशातील सर्व नागरिक या लढाईचे नेतृत्व करत आहे. आज पूर्ण देश एकाच लक्ष्यावर चालला आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

“देशातील कोणीही नागरिक उपाशी राहता कामा नये. तुमच्या हृदयातील भावना कोरोनाविरोधातील लढाईला बळ देत आहेत, कोणी मास्क बनवतं आहे तर कोणी सबसिडी सोडत आहे, कोणी पेन्शन तर कोणी पुरस्काराची रक्कम पीएम निधीला देत आहे, त्यामुळे देशातील प्रत्येक नगारिक या लढाईला ‘पीपल ड्रिव्हन’ बनवत आहे,” असेही मोदी म्हणाले.

कोविड19 लढवय्ये एकत्र

covidwarriors.gov.in या माध्यमातून सव्वा कोटी डॉक्टर, नर्स, प्रशासन, आशा सेविका असे अनेक कोविड19 लढवय्ये एकत्र जोडले गेले आहेत. जर तुम्हाला देशाची सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही यासोबत जोडू शकता, असेही मोदींनी यावेळी सांगितले. 

प्रत्येक लढाई काही ना काही शिकवून जाते. काही नवीन गोष्टी शिकवून जाते. या लढाईमुळे तुम्ही जी स्वंयशिस्त दाखवली ती उल्लेखनीय आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील प्रत्येक जण यापासून मुक्तेतसाठी झटत आहे. हे दिवसरात्र मेहनत करत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी सर्वांचे आभार मानले.

हे सर्व कोविड योद्धा

लाईफलाईन उडान नावाची एक योजना सुरु आहे. त्याद्वारे कोट्यावधींचे धान्य, गरजेच्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवता येत आहेत. त्यासाठी 100 हून अधिक पार्सल ट्रेन चालवले जात आहे. नागरी उड्डाण आणि रेल्वे विभागातील कर्मचारी सहभागी, 500 टन वैद्यकीय साहित्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवत आहेत, हे सर्व कोविड योद्धा आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अनेकांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाले आहेत. गरीबांना तीन महिने मोफत सिलेंडर दिले जात आहे. बँकिंग क्षेत्रातील कर्मचारीही दिवस रात्र काम करत आहे. राज्य सरकारही उत्तम काम करत आहे. त्यांचीही मी प्रशंसा करु इच्छितो, असेही मोदी यावेळी म्हणाले

कोविड वॉरिअर्सवर हल्ला करण्यांविरुद्ध कठोर कारवाई

आपण या लढाईदरम्यान समजाला, नागरिकाला आजूबाजूला बघण्याचा व्यापक दृष्टीकोन मिळाला आहे. घरात काम करणारे लोक असू दे, आजूबाजूचे किंवा इतर नागरिकांमार्फत आपल्याला हे बघायला मिळत आहे. डॉक्टर, रिक्षा चालक, भाजी मंडईत काम करणाऱ्या लोकांविषयी आपले जीवन व्यर्थ आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

डॉक्टर, नर्स, निमवैद्यकीय क्षेत्र अशा कोविड वॉरिअर्सवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करण्यासाठी अध्यादेश आणला. पोलिस, सफाई कर्मचारी यांच्याविषयी जनतेचा दृष्टीकोन बदलला आहे. पोलीस गरजूंना अन्न आणि औषध देत आहेत, यामुळे पोलिसांशी भावनिक नातं जोडलं आहे. पोलीस ज्याप्रकारे समोर येत आहे ते उल्लेखनीय आहे. ज्याप्रकारे आपण या लढाईत लढत आहोत हे फार महत्त्वाचे आहे, असेही मोदींनी यावेळी म्हटलं.

थँक्यू पीपल ऑफ इंडिया

जेव्हा आपली हक्काची गोष्ट सोडून काही लोकं दुसऱ्याची मदत करतात, तेव्हा त्याला संस्कृती म्हणतात. भारताने जगभराला औषध पुरवठा केला आहे. कोरोना संकटात भारताने इतर देशांना औषधं दिली नसती, तर कोणी दोष दिला नसता.

मात्र आपण प्रकृती-विकृती न मानता संस्कृतीचं दर्शन घडवलं आणि औषधांची मदत पोहोचवली, भारताच्या आयुर्वेद आणि योग यांची चर्चा देशभरात केली जात आहे. अनेक देशांनी थँक्यू इंडिया, थँक्यू पीपल ऑफ इंडिया असे म्हटलं.  तेव्हा मला देशातील प्रत्येक नागरिकाचा अभिमान वाटला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोनामुळे या गोष्टी बदलल्या

भारताच्या युवा पिढीला या लढाईला स्विकारावं लागणार आहे. आपल्याला काही तरी करुन दाखवावं लागणार आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यातील पहिला म्हणजे मास्क घालण आपल्या चेहरा झाकणे. याची आपल्याला सवय नाही. पण याचा अर्थ नाही की कोणी आजारी आहे,असे नाही. यामुळे तुमचे सरंक्षण होते.

सार्वजनिक ठिकाणी थुकंणे हे चुकीचे आहे असे अनेकदा सांगण्यात आलं होतं. मात्र ही समस्या जात नव्हती. मात्र आता ती वेळ आली आहे की आता रस्त्यावर थुंकणे बंद केले पाहिजे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही.

आजचा दिवस अक्षय्य तृतीयेचा, आपली धरती, पर्यावरण अक्षय्य राहील, असा संकल्प करुया, आपल्याला ही लढाई कितीही कठीण वाटत असली तरी लढावी लागणार आहे. हे दिवस कायम लक्षात राहणार आहे.

कोरोनामुळे सणांचे स्वरुप बदललं

सध्या रमजानही सुरु आहे. गेल्यावेळी रमजानच्या दरम्यान कोणीही पुढच्या वर्षी असे काही होईल याचा विचारही केला नसेल. रमजानच्या या दिवसात आपण घरी बसून ही लढाई अजून मजबूत करु. रमझानच्या महिन्यात संयम, संवेदनशीलता याचं दर्शन घडवूया, ईदच्या आधी जगातून कोरोना नष्ट होईल, याचे प्रयत्न करूया, असेही मोदी म्हणाले.

या कोरोनामुळे देशाने अनेक सणांचे स्वरुप बदलले आहे. देशातील नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता हे साजरे केले आहे. सर्वांनी आपले सण साजरे घरात राहून साजरा केला यामुळे आपण कोरोनाची लढाईला सामोरे जाऊ शकतो, असेही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.

आपल्या शहर, गाव, ऑफिस, गल्लीत कोरोना पोहोचला नाही, म्हणजे तो कधीच येणार नाही, असा अतिआत्मविश्वास बाळगू नका, जगाचा अनुभव पाहून आपण शिकलो आहोत, नजर हटी, दुर्घटना घटी, अतिउत्साहात निष्काळजी दाखवू नका. आपल्याकडे नजर हटी दुर्घटना घटी असे सांगितले जाते. त्यावर नक्की लक्ष ठेवा, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

दो गज दुरी, बहोत हे जरुरी

“भारतात कुठेही लापरवाही होऊ नये याची काळजी घ्या. दो गज दुरी, बहोत हे जरुरी, असा मंत्र नक्कीच लक्षात ठेवा.”

“पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा यापासून मुक्त होण्यासाठी काही बातमी असावी, आपण या कोरोनापासून बाहेर येऊ, या प्रार्थनेसोबत तुमचा निरोप घेतो,” असेही सांगत मोदींनी मन की बातचा शेवट (PM Narendra Modi Corona Mann ki Baat) केला.

संबंधित बातम्या : 

Mann Ki Baat : जगाला औषधांची मदत करुन भारताने संस्कृतीचं दर्शन घडवलं : पंतप्रधान

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…