रितू तावडेंनी किरीट सोमय्या पासून स्वत:चा बचाव करावा, ठाकरे गटाच्या नेत्याचा सल्ला
"महायूतीचं सरकार आहे, झिशान सिद्धीकी तिथे डिमोलिशन थांबवायला जातात, दुसऱ्या बाजूला भाजपचे व्हिडियो सुपरस्टार जातात, दोघांनी एकत्र प्रेस कॉन्फ्रस घेऊन भूमिका स्पष्ट करावी. भाजपची माकडे वांद्रेत स्टंटबाजी करत आहेत"

“नेमके किरीट सोमय्या आहेत तरी कोण? त्यांच्या पक्षात त्यांना कुणी सिरीयसली घेत नाही, कामधंदा नाही, बीएमसीत त्यांची काही भूमिका नाही… ना रेल्वेचे अधिकारी आहेत… एक दुर्लक्षित राजकारणी… आहेत” अशी टीका उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी केली आहे. “मुंबईवर नियुक्त झालेले स्वयंघोषित ‘सुपर कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी’ असल्यासारखे वागतात. सोमय्या नौटंकीचा पार्ट २ , थोमय्यांनी किती बांग्लादेशी सापडले यांचा आकडा सांगावा ?” असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. “तरीही अचानक वांद्रे पूर्वेत तमाशा करत आहेत. इतक्या वर्षांपासून बांगलादेशी घुसखोरांनी येथे बेकायदेशीर वस्ती केली होती, तर मग देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती? याचं अपयश कुणाचं आहे?” असा सवाल चित्रे यांनी विचारला.
“सध्या तुम्ही ज्या रितू तावडेंचं नाव घेतलं, त्यांना हटवण्याची मोहीम किरीट सोमय्यांनी हाती घेतली आहे. रितू तावडेंनी किरीट सोमय्या पासून स्वत:चा बचाव करावा, ते सुपर कॉस्टिट्युशनल पद असल्यासारखे वागत आहेत” असं अखिल चित्रे म्हणाले. “कथित बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्यासाठी नेमके काय नियोजन आहे? बस? ट्रेन? जहाज? की विमान? हे सांगावं. आतापर्यंत नक्की किती बांगलादेशी सापडले याचा अधिकृत आकड काय?” असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
भाजपची माकडे वांद्रेत स्टंटबाजी करत आहेत
“महायूतीचं सरकार आहे, झिशान सिद्धीकी तिथे डिमोलिशन थांबवायला जातात, दुसऱ्या बाजूला भाजपचे व्हिडियो सुपरस्टार जातात, दोघांनी एकत्र प्रेस कॉन्फ्रस घेऊन भूमिका स्पष्ट करावी. भाजपची माकडे वांद्रेत स्टंटबाजी करत आहेत, दंगली घडल्या नाहीत हेच माकडांच्या पोटातील दुखणं” असं अखिल चित्रेंनी म्हटलय. कॉक्रोज जनता पार्टीने भाजपला आरसा दाखवला असंही ते म्हणाले.
शौचालयाच्या जागेत भाजपचं सुसज्ज कार्यालय
अखिल चित्रे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी 2024 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. अखिल चित्रे सोशल मीडियावरुन सातत्याने सामाजिक मुद्दे मांडतात.भाजपला ते अनेकदा कोंडीत पकडत असतात. अलीकडे त्यांनी जनतेसाठी शौचालयाच्या जागेत भाजपने सुसज्ज कार्यालय, तयार केल्याचा प्रकार उघडकीस आणला होता.