AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनतेसाठी शौचालयाच्या जागेत भाजपचं सुसज्ज कार्यालय, मुंबईतला धक्कादायक प्रकार

"नागरिकांसाठी असलेली शौचालयाची जागा BJP च्या कार्यालयात आणि प्रचार साहित्याच्या गोदामात रूपांतरित झाल्याचा प्रकार समोर आला आहे" उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने यावर आवाज उठवला आहे.

जनतेसाठी शौचालयाच्या जागेत भाजपचं सुसज्ज कार्यालय, मुंबईतला धक्कादायक प्रकार
BJP Office
| Updated on: May 09, 2026 | 8:36 AM
Share

एकीकडे ‘स्वच्छ भारत’च्या जाहिराती आणि दुसरीकडे सार्वजनिक शौचालयाच्या जागेवर पक्षाचे कार्यालय… हीच का भाजपची विकासाची व्याख्या? असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी विचारला आहे. अखिल चित्रे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी 2024 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. सोशल मीडियावर सक्रीय असणारे अखिल चित्रे सातत्याने असे सामाजिक मुद्दे मांडतात. त्यातून ते विद्यमान सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करतात. आता त्यांनी बोरीवलीच्या अक्सर गावातील जागेवरुन सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं आहे. देशात, राज्यात आणि मुंबई महानगर पालिकेत भाजपची सत्ता आहे.

“नागरिकांसाठी असलेली शौचालयाची जागा BJP च्या कार्यालयात आणि प्रचार साहित्याच्या गोदामात रूपांतरित झाल्याचा प्रकार समोर आला आहे. BMC ने नियोजित केलेल्या १८ पैकी १० शौचालये गायब, आणि जिथे सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळायला हव्या होत्या तिथे राजकीय बैठकांचे हॉल उभे करण्यात आलेत” असा आरोप अखिल चित्रे यांनी केला आहे.

हा मुंबईकरांचा अपमान

“महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत स्थानिक नागरिकांना शौचालयासाठी हाल सहन करावे लागत आहेत, पण सत्ताधाऱ्यांना मात्र पक्षाचे बॅनर्स ठेवण्याची अधिक चिंता दिसते.सार्वजनिक सुविधांवर राजकीय कब्जा करणे हा मुंबईकरांचा अपमान आहे” असं म्हणतं त्यांनी @mybmc @BJP4Mumbai  @TawdeRitu यांना टॅग केलं आहे. संबंधित प्रशासनाने याची तात्काळ चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी केली आहे.

आम्हीही पाहून घेऊ

दोन दिवसांपूर्वी मासे कापून विकण्यावर निर्बंध घालण्याच्या कथित निर्णयावरून त्यांनी टीका केली होती. “कोळ्यांनी मासळी बाजारात मासे कापून विकू नये” असा निर्णय भाजपा-शिंदे गटाकडून घेतला जातो. का? तर म्हणे अस्वच्छता पसरते. मुंबईच्या खऱ्या मूळ रहिवासी म्हणजे आमच्या कोळीबांधवांच्या उदरनिर्वाहावर अशाप्रकारे गदा आणणारे तुम्ही कोण? आमचं त्या सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान आहे, आमचे कोळी बांधव मुंबईत मासे विकणार… तुमच्या नाकावर टिच्चून आणि वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने विकत आलेत त्याच पद्धतीने विकणार… मुंबई महापालिकेने कोळी बांधवांवर कारवाई करुन दाखवावीच. आम्हीही पाहून घेऊ कि मुंबईच्या खऱ्या मानकरींना कोण डिवचतं ते” अशी पोस्ट त्यांनी केली होती.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?