AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खे पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनला, सुनेत्रा पवार गैरहजर, अखेर काय घडले..

शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि सारंग यांचे रिसेप्शन दिल्लीत पार पडले. या रिसेप्शनला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, पवार कुटुंबातील महत्वाचा सदस्याने या रिसेप्शनकडे पाठ फिरवली.

अख्खे पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनला, सुनेत्रा पवार गैरहजर, अखेर काय घडले..
Supriya Sule Sunetra Pawar
| Updated on: Aug 11, 2026 | 9:44 AM
Share

खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचे रिसेप्शन दिल्लीत पार पडले. या रिसेप्शनला मोठे राजकीय नेते उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य बडे नेते उपस्थित होते. या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. तब्बल 20 मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी या रिसेप्शनमध्ये होते. शरद पवार यांच्यासोबत काहीवेळ गप्पा मारत नरेंद्र मोदी बसले होते. या रिसेप्शनमधील खास फोटो पुढे आलीत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत पुर्ण पवार कुटुंबाने फोटोही घेतला. मात्र, रेवती आणि सारंग यांच्या रिसेप्शनला घरातील एका सदस्यानेच दांडी मारली, ज्यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. रेवती सुळेच्या रिसेप्शनला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गैरहजर होत्या.

सुनेत्रा पवार जरी रेवतीच्या रिसेप्शनला गैरहजर होत्या तरीही पार्थ पवार आणि जय पवार यांनी या रिसेप्शनला हजेरी लावली. अजित पवारांचे दोन्ही लेक या रिसेप्शनला हजर होते. ज्यामुळे आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. मात्र, सुनेत्रा पवार या रिसेप्शनला नक्की का गैरहजर होत्या, याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही.

रेवतीच्या रिसेप्शननिमित्त पूर्ण पवार कुटुंब एकत्र होते. मात्र, त्याला अपवाद ठरल्या त्या म्हणजे सुनेत्रा पवार. जवळपास पवार कुटुंबातील सदस्य या रिसेप्शनला हजर होते. अमित शाह देखील बऱ्याचवेळ येथे उपस्थित होते. शरद पवार आणि सुळे कुटुंबासोबत गप्पा मारताना अमित शाह दिसले. शरद पवार यांच्या शेजारी अमित शाह बसले होते.

विशेष म्हणजे ज्यावेळी राहुल गांधी या रिसेप्शनमध्ये होते, त्याचवेळी अमित शाह देखील पोहोचले. अमित शाह रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर पोहोचले, त्यावेळी राहुल गांधी तिथेच खाली होते. दिवसभर मोठ्या राजकीय नेत्यांनी या रिसेप्शनला हजेरी लावली. सुप्रिया सुळे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना फोटोंमध्ये दिसत आहे.

Follow Us
21व्या वर्षात संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी...
ठाण्यात आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी विश्वविक्रमासाठी सज्ज
कोकणात फेटेवाले आणि धोतर नेसलेल्या पारंपरिक गणेशमूर्तींना वाढती मागणी
कोकणात फेटेवाले आणि धोतर नेसलेल्या पारंपरिक गणेशमूर्तींना वाढती मागणी
वडीगोद्रीचं पार्किंग फुल्ल; हजारो आंदोलक पायी अंतरवालीकडे रवाना
Jalna | जरांगेंच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद! वडीगोद्रीचं पार्किंग फुल्ल; हजारो आंदोलक पायी अंतरवालीकडे रवाना
आदित्य ठाकरेंनी नाशिकमध्ये आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची घेतली भेट
नाशिकमध्ये 16 दिवसांपासून उपोषणावर असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे यांचा संवाद
विद्यानंद बापट हल्ल्याप्रकरणी रोहित पवारांची तीव्र प्रतिक्रिया
विद्यानंद बापट हल्ल्याप्रकरणी रोहित पवारांची तीव्र प्रतिक्रिया; गुंडगिरी अजिबात योग्य नाही
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याबाबत पोलिसांची मोठी प्रतिक्रिया;
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याबाबत पोलिसांची मोठी प्रतिक्रिया; गणेशोत्सवाआधीच मोठा वाद
'लोकशाही नाही म्हणणाऱ्या शिंदेंची निवडही लोकशाही पद्धतीनेच झाली'
'लोकशाही नाही म्हणणाऱ्या शिंदेंची निवडही लोकशाही पद्धतीनेच झाली' राऊतांची टीका
वसमतमध्ये आमदारांची प्रतिकात्मक तिरडी काढत मराठा आंदोलकांचा संताप
Hingoli | वसमतमध्ये आमदारांची प्रतिकात्मक तिरडी काढत मराठा आंदोलकांचा संताप
मराठा आरक्षणाच्या 90% मागण्या पूर्ण! गिरीश महाजनांचा मोठा दावा
Girish Mahajan | मराठा आरक्षणाच्या 90% मागण्या पूर्ण! गिरीश महाजनांचा मोठा दावा; जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याचं आवाहन
आवरा हे गुंड! विद्यानंद बापटांच्या मारहाणीवर सुप्रिया सुळे आक्रमक
आवरा हे गुंड! विद्यानंद बापटांच्या मारहाणीवर सुप्रिया सुळे आक्रमक, म्हणाल्या...