AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prashant Kishor: मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार यांच्या भेटीला, राजकारणात नवा ट्विस्ट?

Prashant Kishor Meets Sunetra Pawar : भाजपला बिहारमध्ये धोबीपछाड दिल्यानंतर जन स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत किशोर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भे

Prashant Kishor: मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार यांच्या भेटीला, राजकारणात नवा ट्विस्ट?
प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार
| Updated on: Aug 06, 2026 | 1:40 PM
Share

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा परंपरागत मतदारसंघ रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी हिसकावला. त्यांनी बांकीपूर विधानसभेत भाजपला अस्मान दाखवले. त्यांच्या विजयाने भाजपला मोठा धक्का बसला. आता प्रशांत किशोर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी सुद्धा दोन महिन्यांपूर्वी किशोर हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी खासदार पार्थ पवार हे सुद्धा उपस्थित होते.

प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांच्या भेटीला दाखल झाले. देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोर दाखल झाले आहेत. बिहारमधील बांकीपूरमध्ये आता निवडणूक जिंकल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. पण या भेटीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.पण भेट नेमकी का घेतली जात आहे हे थोड्यावेळात समोर येईल. सध्या किशोर हे पवार यांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर पोहचले आहे. निवडणुकीतील विजयानंतर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते आले असल्याचे माहिती समोर येत आहे. पार्थ पवार यांची सुद्धा ते भेट घेतील.

मे महिन्यात झाली होती भेट

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि अजितदादा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मे महिन्यात भेट झाली होती. किशोर यांना राजकारणाचीच नाही तर समाजाची सुद्धा चांगली जाण आहे, असे पार्थ पवार म्हणाले होते. त्यावेळी राज्य, देश आणि संघटनेविषयी अनेक विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. अजितदादा आणि प्रशांत किशोर यांची जुने संबंध होते. ते मुंबईत आल्यानंतर त्यांच्याशी चांगला संवाद झाला असे पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.

बांकीपूरमध्ये जोरदार विजय

नितीन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. ते बांकीपूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी राजीनामा दिला होता. या जागेवर पोटनिवडणूक झाली. या ठिकाणी निवडणूक लढवण्याचे शिवधनुष्य जन स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी उचलले. बांकीपूर हा भाजपचा गड मानल्या जातो. 1995 पासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. तर सलग चार वेळा नबीन हे या मतदारसंघातून विजय झालेले होते. त्यामुळे भाजप सहज विजय होईल असे मानले जात असताना किशोर यांनी येथे सत्ताधाऱ्यांच्या गडाला सुरूंग लावला. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ते विजयी झाले.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं