AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : ओ मुंढे काका… आमचा वडापाव सुरू करा ना… विद्यार्थ्याचा Video इन्स्टावर व्हायरल

तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळेतील वडापाव विक्रीवर बंदी घातली आहे. यावर नाराज विद्यार्थ्याने मुंढे काकांना वडापाव पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. मुंढेंनी मात्र स्मितहास्य करत तळलेले पदार्थ टाळण्याचा आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांच्या या संवादाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून, आरोग्यपूर्ण आहारावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Tukaram Mundhe : ओ मुंढे काका... आमचा वडापाव सुरू करा ना... विद्यार्थ्याचा Video इन्स्टावर व्हायरल
Tukaram MundheImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 9:43 AM
Share

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी शाळेच्या कँटीनमध्ये आणि शाळा परिसरात वडापाव विक्रीला बंदी घातली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आपला आवडीचा आणि लोकप्रिय वडापाव पुन्हा सुरू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. त्यावर तुकाराम मुंढे यांनी खाण्यापिण्यापासून ते आरोग्यापर्यंतचे अनेक सल्ले या विद्यार्थ्याला दिले आहेत. दोघांच्या संवादाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

या छोट्या विद्यार्थ्याने तुकाराम मुंढे यांच्यासमोर थेट आपली मागणी ठेवली. शाळेत वडापाववर बंदी घातली आहे. पण वडापाव विक्री सुरू व्हावी, असं मला आणि माझ्या मित्रांना वाटतंय. यावर तुमचं काय म्हणणं आहे? असा सवाल या विद्यार्थ्याने मुंढे यांना केला. या विद्यार्थ्याची मागणी नाकारण्याऐवजी तुकाराम मुंढे स्मित हास्य करताना दिसत आहेत. त्यानंतर, मुलांनी आवडत्या स्नॅक्सच्या पलिकडेही जाऊन विचार केला पाहिजे, असं हसत हसत मुंढे या विद्यार्थ्याला समजावताना दिसत आहेत.

आपण वडापाव नाही खाल्ला तर आयुष्य थांबणार नाही. त्याउलट तुम्ही जर पौष्टीक आहार घेतला तर तुमचा विकास अधिक चागंला होईल, असं मुंढे यांनी या विद्यार्थ्याला सांगितलं. मुंढे यांनी थेट उत्तर दिलं. पण त्यांच्या बोलण्यात कठोरता नव्हती. अत्यंत मृदू भाषेत ते समजावत होते. त्यांनी यावेळी आईवडील आणि शाळेच्या समोर निर्माण होणाऱ्या आव्हानांची माहितीही या विद्यार्थ्याला दिली. रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही पदार्थांबाबत पुन्हा विचार केला पाहिजे, हे मुलांना कसं समजवावं, याचं आईवडील आणि शाळेला नेहमीच टेन्शन असतं, असंही त्यांनी सांगितलं.

तळाऊ पदार्थांपासून दूर राहा

यावेळी त्यांनी तळलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला. त्याऐवजी पौष्टीक आहार घ्या. प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर भर द्या, असा सल्लाही त्यांनी दिला. मुलांच्या शारिरीक विकासासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, हेल्दी फॅट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स सामील असलेला आहार घ्या. डाळ, शेंगा, दूध, दही, अंडी आणि प्रोटीन युक्त अन्य खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांच्या विकासाला मदत करत असतात. याचा अर्थ असा नाही की वडापाव खाल्ल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. खरं तर मुलं नियमितपणे काय खातात हे फार महत्त्वाचं असतं. कमी पौष्टीक खाद्य पदार्थांच्या ऐवजी संतुलित आहाराच्या जागी किती स्नॅक्स घेतात हेही अधिक महत्त्वाचं असतं.

चायनीज फूडवर काय म्हणाले?

यावेळी त्यांना चायनीज फूडबाबतही विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी काही खाद्य पदार्थात कृत्रिम रंग आणि रसायन मिसळले जातात, त्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. चवीपेक्षा आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे. खाद्यपदार्थात काय टाकलं जातं याची माहिती नसेल तर अधिक सावध राहिलं पाहिजे. चायनीज स्टाईलचा कोणताही पदार्थ चांगला नसतो. हे पदार्थ जिथे बनवले जातात तिथे साफ सफाई कशी आहे, पदार्थात काय काय टाकलं जातं, हे पाहिलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला