लग्नानंतर मी कधीही वड पूजला नाही… महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणतात, असाही एक वर्ग!

रुपाली पाटील चाकणकरांनी ही भूमिका मांडल्यामुळे त्यांना अनेक टीकाकारांचे फोन येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावर त्या म्हणाल्या, 'टीकाकारांचेही मी आभार मानते. टीका करणा-यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण त्यांच्यामुळे अभ्यासपूर्ण विचारांच्या उंचीचे सातत्य राखता येते.'

लग्नानंतर मी कधीही वड पूजला नाही... महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणतात, असाही एक वर्ग!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 4:43 PM

मुंबईः ‘मी वडाच्या झाडाला दोरे बांधून, फे-या मारत नाही किंवा मी वडाचा झाडाची फांदी तोडून कधीही वटपौर्णिमा (Vatpaurnima) साजरी करत नाही. लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही,’असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकलणकर (Rupali Chakankar) यांनी केलं आहे. खरं तर हे वक्तव्य त्यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केलं. पण त्यानंतर त्यांना अभिनंदनाचे तसेच तीव्र शब्दात टीका करणारे अनेक फोन आल्याची माहिती त्यांनी दिली. समाजात माझ्या भूमिकेचं काहींनी स्वागत केलं तर काहींनी टीकाही केली. पण असा विचार करणाराही एक वर्ग आहे, असं चाकणकर यांनी सांगितलं. वटपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यभरात महिला वर्गाकडून वडाच्या झाडाची पूजा केली जातेय. तसेच महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून सात जन्म हाच पती मिळावा, अशी कामना समस्त महिलावर्गाकडून केली जाते. मात्र एकिकडे अशी भावना आणि भूमिका असलेल्या महिला असतानाच ज्योतिबा आणि सावित्रींच्या (Jyotiba Savitribai Fule) विचारांचा वारसा पुढे नेणाऱाही एक वर्ग आहे, असं वक्तव्य चाकणकर यांनी केलंय.

वटपौर्णिमेविषयी चाकणकरांची भूमिका काय?

वटपौर्णिविषयी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्वीटरद्वारे त्यांची भूमिका व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाची पूजा केली नाही. मात्र अशी पूजा करणाऱ्यांच्या भावना आणि भूमिका मी समजू शकते. याच वेळी वडाची पूजा न करणाराही एक वर्ग आहे. तसंच ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा  विचार पुढे नेणारा आणि विज्ञानवादी विचार करणाराही एक वर्ग आहे. मला वड पूजण्यापेक्षा वडाचे, वृक्षांचे संवर्धन करणे अधिक योग्य वाटते. काय योग्य काय अयोग्य याचा विचार ज्याचा त्याने करावा आणि तशी कृती करावी, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘टीकाकारांमुळे विचारांत सातत्या राखता येतं’

रुपाली पाटील चाकणकरांनी ही भूमिका मांडल्यामुळे त्यांना अनेक टीकाकारांचे फोन येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावर त्या म्हणाल्या, ‘टीकाकारांचेही मी आभार मानते. टीका करणा-यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण त्यांच्यामुळे अभ्यासपूर्ण विचारांच्या उंचीचे सातत्य राखता येते.’

‘वृक्षसंवर्धन करणं हीच आमची वटपौर्णिमा’

वृक्षसंवर्धन हीच वटपौर्णिमा, अशी भूमिका मांडताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘ यंदाच्या वर्षी आम्ही सहकुटुंब वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. माझ्या पतीने वडाचे रोप लावून पूजा केली आणि सात फे-या पूर्ण करुन जन्मोजन्मी ही वैचारिक साथ कायम रहावी म्हणून प्रार्थना केली. ऑक्सिजनचा स्रोत असणा-या वडाचे रोपटे लावणे, रोपवाटप आणि वृक्षसंवर्धन हीच आमची ‘वटपौर्णिमा’.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.