यावेळी ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब होईल; उद्धव ठाकरे यांचा इशारा

| Updated on: May 24, 2023 | 2:16 PM

सर्वोच्च न्यायालयाने दोन निकाल दिले. एक शिवसेनेचा आणि दिल्लीचा. लोकशाहीत लोकप्रतिनीधीला महत्त्व असतं. मी आपची बाजू घेत नाही. त्यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला.

यावेळी ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब होईल; उद्धव ठाकरे यांचा इशारा
Uddhav Thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : लोकशाही जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळेच सर्व विरोधक एकत्र आले आहेत. यंदाचं वर्ष निवडणुकीचं आहे. त्यामुळे यावेळी जर गाडी सुटली तर देशातून लोकशाहीच गायब होईल, असा सूचक इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी मीडियाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोकं केवळ राजकारण करतात. आम्ही मात्र राजकारणाच्या पलिकडे जाऊन नातं जपत असतो. येणारं वर्ष निवडणुकीचं आहे. यावेळी ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब होईल. लोकशाही वाचवण्यासाठी केवळ विपक्ष हा गोलमाल शब्द आहे. कुणाचा विरोधक? आम्ही सर्व देशप्रेमी आहोत. जे लोक देशातून लोकशाही हटवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना देशविरोधी म्हटलं पाहिजे. आम्ही संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

लोकांनी जागं राहावं

सर्वोच्च न्यायालयाने दोन निकाल दिले. एक शिवसेनेचा आणि दिल्लीचा. लोकशाहीत लोकप्रतिनीधीला महत्त्व असतं. मी आपची बाजू घेत नाही. त्यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला. तो लोकशाहीच्या बाजूचा होता. पण केंद्र सरकारने त्याविरोधात अध्यादेश आणला हे कोणती लोकशाही आहे. असेही दिवस येतील की राज्यातील निवडणुकाच होणार नाही. तर 2024नंतर फक्त लोकसभेच्या निडवणुका होतील. त्यामुळे लोकांनी जागं झालं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

तर मोदी सरकार पडेल

आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या विरोधातील अध्यादेशाला विरोध करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं आहे. राज्यसभेत शिवसेना आम्हाला पाठिंबा देणार आहे. जर राज्यसभेत अध्यादेश रद्द झाला तर 2024मध्ये मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

सध्याचं केंद्र सरकार अहंकारी आहे. या सरकारने आम्हाला सभागृह चालवण्यापासूनही रोखलं. आम्हाला त्यासाठी कोर्टात जावं लागलं. हे असंच चालू राहिलं तर उद्या पंतप्रधान आणि 31 राज्यपालांनी मिळूनच देश आणि राज्य चालवावं, असा घणाघाती हल्लाही केजरीवाल यांनी केला.