Western Railway : पश्चिम रेल्वेकडून मेगा ब्लॉक जाहीर, रविवारी गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सेवा बंद राहणार, प्रवाशांसाठी महत्त्वाचं आवाहन

| Updated on: Dec 25, 2021 | 7:25 AM

रेल्वेकडून पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या ( 26 डिसेंबर ) रोजी पाच तासांचा जंम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेकडून मेगा ब्लॉक जाहीर, रविवारी गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सेवा बंद राहणार, प्रवाशांसाठी महत्त्वाचं आवाहन
लोकल ट्रेन
Follow us on

मुंबई : रेल्वेकडून पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या ( 26 डिसेंबर ) रोजी पाच तासांचा जंम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेच्या पश्चिम लाईनवर उद्या मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो मेगाब्लॉक पाच तासांसाठी घेण्यात आला आहे.

बोरिवली ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान अप-डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. गोरेगाव आणि बोरिवली दरम्यानच्या स्लो लाईनवर हा ब्लॉक असेल. मेगा ब्लॉक उद्या सकाळी 10.35 वाजता सुरु होईल आणि दुपारी 3.35 वाजता संपेल.

स्लो ट्रेन फास्ट ट्रॅकवरुन धावणार

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॉक काळात बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावरील सर्व स्लो लाईनवरुन धावणाऱ्या ट्रेन फास्ट लाईनवरुन धावतील. बोरिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1,2,3,4, हे बंद असतील. मेगाब्लॉकमुळे उपनगरीय लोकलच्याकाही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द केलेल्या फेऱ्यांची यादी स्टेशन मास्तर कार्यालयात पाहायला मिळेल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी असं सुमित ठाकूर यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या:

Internet Wifi | स्टेशनवर आहेच, आता डब्यातही मिळणार! रेल्वेची प्रवाशांना वायफाय खूशखबर

मुंबईकरांना रेल्वे तिकीटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, Mobile Ticketing App सुरु

Western Railway take a Jumbo Block of five hours on UP and DOWN Slow lines between Borivali and Goregaon on 26 Decemeber