AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांना सोबत घेण्याची गरज काय होती, भाजपला संघाने सुनावले खडेबोल

संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधून भाजपला खडेबोल सुनावले आहेत. अजित पवारांना घेण्याची गरजच काय होती. त्यांच्यामुळं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं संघाच्या मुखपत्रानं म्हटलं आहे.

अजित पवारांना सोबत घेण्याची गरज काय होती, भाजपला संघाने सुनावले खडेबोल
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 12, 2024 | 9:16 PM
Share

अजित पवारांना सोबत घेवून, भाजपनं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली, अशा शब्दात संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून भाजपला खडेबोल सुनावले आहेत. शिंदेंना सोबत घेतल्यानंतर बहुमत असताना अजित पवारांना सोबत घेण्याची गरजच काय होती ? असा सवाल संघाच्या मुखपत्रातून करण्यात आलाय. महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला बहुमत असतानाही अजित पवार गटाला सोबत घेतलं. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला सहज बहुमत मिळालं असतं, चुलत भावांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली असती. हे चुकीचे पाऊल का उचलले गेले ?, अनेक वर्षे काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपच्या समर्थकांना धक्का बसला. एका फटक्यात अजित पवारांना सोबत घेवून भाजपनं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली.

भाजप ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख सांगतो, परंतू भाजपची ओळख ‘पार्टी विदाऊट एनी डिफरन्स’ अशी झाली आहे. संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणवलेल्या काँग्रेसजनांना भाजपने नेते बनवलं आहे. तर अजित पवारांना घेण्याचा निर्णय भाजपचा होता. संघाच्या मुखपत्रातील वक्तव्य गांभीर्यानं घेण्यासारखं असून भविष्यात मोठा निर्णय अपेक्षित असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

आता मोठा निर्णय कोणता ?, यावरुन खलबतं सुरु झाली आहेत. अजित पवारांना सोबत घेवून भाजपला वर्ष झालं. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा जबर पराभव झाला. अजित पवारांना घरात अर्थात बारामतीतही जिंकता आलं नाही. त्याच पार्श्वभूमीवर संघानं मुखपत्रातून संताप व्यक्त केलाय.

तर लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांवर खापर फोडलं जात असल्याचं काँग्रेसच्या सतेज पाटलांनी म्हटलंय. अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांनाही धक्का बसला असं संघानं मुखपत्रातून म्हटलंय. मात्र 10 महिन्यांआधी फडणवीसांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती ही पॉलिटिकल असल्याचं म्हटलं होतं.

शिंदेंच्या बंडानंतर सत्तेची चक्र फिरली आणि पुन्हा भाजप सत्तेत आली. मात्र वर्षभरातच अजित पवारांनी बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी केली. भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुती झाली. मात्र लोकसभेच्या निकालात जनतेनं जो कौल दिला, त्याला अजित पवार जबाबदार असल्याचं सूचकपणे संघाच्या मुखपत्रातून छापण्यात आलंय.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी