Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | ठाकरे VS शिंदे, निकाल नेमका कसा लागणार?

सुप्रीम कोर्टाने जर बहुमत परीक्षणाचे आदेश दिले तर, पुन्हा हाच प्रश्न निर्माण होईल की व्हीप कोणाचा लागू होणार? शिंदेंची शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू शकते का? कारण निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंना दिलंय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | ठाकरे VS शिंदे, निकाल नेमका कसा लागणार?
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 11:42 PM

मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल (Maharashtra Political Crisis) नेमका काय लागणार? शिंदेंसह 16 आमदारांचं नेमकं काय होणार? याकडे फक्त सरकारच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात. मात्र निकाल नेमका कसा लागू शकतो, घटनातज्ज्ञांना काय शक्यता वाटतात, ते जाणून देणं महत्त्वाचं आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी संपली आणि आता निकाल येणार आहे. पुढच्या आठवड्यात घटनापीठ निकाल देईल अशी शक्यता आहे. पण निकाल लागणार म्हणजे नेमकं काय होणार? घटनापीठ कशाप्रकारे निकाल देऊ शकतं? ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

एक तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे जाऊ शकतं. किंवा 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळांकडे जाऊ शकतं. तिसरा पर्याय, विधानसभेत बहुमत परीक्षणाचे पुन्हा आदेश दिले जाऊ शकतात. आणि बहुमत परीक्षणावेळी राहुल नार्वेकर किंवा झिरवळ अध्यक्षपदी न राहता हंगामी अध्यक्ष सुद्धा नेमला जाऊ शकतो.

सत्तासंघर्षावर गुरुवारी जी शेवटची सुनावणी झाली त्यात युक्तिवादावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी 9 महिन्यांआधीची परिस्थिती ठेवण्याची मागणी केली. पण खरंच 9 महिन्यांआधीची जैसे थे परिस्थिती केली जाऊ शकते का? कारण त्यात घटनात्मक पेच हा आहे की उद्धव ठाकरेंनी स्वत:हून राजीनामा दिलाय.

जर बहुमत परीक्षणाचे आदेश दिले तर?

जर बहुमत परीक्षणाचे आदेश दिले तर, पुन्हा हाच प्रश्न निर्माण होईल की व्हीप कोणाचा लागू होणार? शिंदेंची शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू शकते का? कारण निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंना दिलंय. शिवसेना विधीमंडळ पक्ष म्हणून शिंदेंच्या शिवसेनेलाच मान्यता आहे. आणि ठाकरे गटाचे आमदार धनुष्यबाण चिन्हावरच निवडून आलेत. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होणार का? की बहुमत परीक्षणाचे आदेश देतानाच, कोर्ट व्हीप संदर्भात काही सूचना देईल? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या 9 महिन्यात ठाकरे आणि शिंदेंच्या वकिलांकडून, पूर्ण ताकदीनं युक्तिवाद झालाय. आता प्रतीक्षा निकालाची आहे. तर दोन्ही गटाकडून आपआपल्या विजयाचा दावा होतोय. युक्तिवाद संपलाय आणि निकाल राखून ठेवण्यात आलाय. आता फैसला कोणताही येवो, तो ऐतिहासिक आणि अनेक वर्षे पुढच्या प्रकरणांमध्ये दाखले देणारा असेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.