घरोघरी जेवण पोहोचवणारा जेव्हा चहा-बिस्कीटवर आपली भूक भागवतो, भावनिक करणारा VIDEO

Swiggy man viral video | सोशल मीडियावर सध्या एका स्विगी बॉयचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकं भावनिक प्रतिक्रिया देत आहेत.

घरोघरी जेवण पोहोचवणारा जेव्हा चहा-बिस्कीटवर आपली भूक भागवतो, भावनिक करणारा VIDEO
| Updated on: Aug 31, 2023 | 4:57 PM

मुंबई | सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही रडवतात तर काही खूप हसवतात. काही परिस्थितीची जाणीव करुन देतात तर काही परिस्थिती बदलवण्यासाठी प्रेरित ही करतात. व्यक्ती हा अनेक संघर्ष केल्यानंतर एखाद्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा त्याचा आनंद वेगळाच असतो. संघर्ष हा सगळ्यांच्या वाट्याला येतो. मग तो श्रीमंत असो की गरीब. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे. स्वीगी आणि झोमॅटोवर आजकल लोकं काही सेकंदात फूड ऑर्डर करतात. मग फूड डिलीव्हरी बॉय आपल्यापर्यंत तो पोहोचवतो. याच फूड डिलिव्हरी करणाऱ्या या व्यक्तीचा हा व्हिडिओ परिस्थिती कशी प्रत्येकासाठी वेगवेगळी असते हे दर्शवते. कारण इतरांना जेवण पोहोचवणाऱ्याच्या नशीबात पोटभर जेवण नसतं.

या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय एका दुकानाबाहेर बसून चहा बिस्कीच खातांना दिसत आहे. जो घरोघरी जेवण पोहोचतो तोच मात्र चहा-बिस्कीटवर भूक भागवताना दिसत आहे. अनेक तास उपाशी राहून तो इतरांचं पोट भरण्यासाठी फूड डिलिव्हरी करतो.

एका आठवड्यातपासून हा व्हिडिओ व्हायरल होत असून 30 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. लोकं यावर वेगवेगळ्या कमेंट्स देखील करत आहेत. कोणी म्हणतंय, कृपया या लोकांशी चांगले वागा. एक माणूस म्हणून प्रत्येकाने त्यांचा आदर केला पाहिजे.

एका यूजरने लिहिले की, ‘जर तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तर तो तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परत येईल. कोणी म्हणतंय त्यांनी ३० ते ५० रुपये टीप द्या. आपल्या या छोट्या मदतीमुळे कदाचित त्याचा दिवस अधिक चांगला होईल.