
छोटा राजन… तुम्ही हे नाव नक्कीच ऐकले असेल, पण मोठा राजन कोण होता हे तुम्हाला माहित आहे का? हा होता छोटा राजनचा गुरु… राजन महादेव नायर उर्फ मोठा राजन! असे म्हणतात की तो गुन्हेगारीच्या जगात छोटा राजनचा (Chhota Rajan) गुरु होता आणि दाऊदचा खास माणूस होता. असेही म्हटले जाते की जर तो जिवंत असता तर आज दाऊद आणि छोटा राजन यांच्यात वैर झालेच नसते. चला जाणून घेऊय या मोठा राजनविषयी… गुन्हेगारीच्या जगातील मोठे नाव मुंबईत कधीकाळी शिंपी म्हणून काम करणारा मोठा राजन, राजन नायर याने आपल्या प्रेयसीसाठी गुन्हेगारीची सुरुवात केली. तो जे...