.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC eletion 2022 Ward 22 – मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 22 मध्ये कोण मारणार बाजी? मविआ विरुद्ध भाजपा लढत?

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 22 मध्येही यंदाची निवडणूक ही चुरशीची मानण्यात येते आहे. गेल्या निवडणुकीत या ठिकाणी भाजपाने सरशी मिळवली होती, यंदाच्य़ा निवडणुकीत शिवसेना हे आव्हान पेलणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

BMC eletion 2022 Ward 22 - मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 22 मध्ये कोण मारणार बाजी? मविआ विरुद्ध भाजपा लढत?
भाजपाला रोखणार?Image Credit source: TV 9 marathi
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Aug 20, 2022 | 2:48 PM
Share

मुंबई – मुंबई महापालिकेच्या (BMC election 2022)यंदाच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात हा सामना रंगणार असला तरी संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे असणार आहे. शिवसेनेतील (Shivsena)बंडाळीनंतरची ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे, हे नक्की. मराठी माणूस आणि मुंबईकर यांचे शिवसेनेची वेगळे नाते आहे. यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील मराठी माणूस शिवसेनेच्या किती पाठिशी आहे, हे स्पष्ट होणार आहे. तसेच ही निवडणूक शिवसेना महाविकास आघाडीत एकत्र लढणार का, काँग्रेसची भूमिका काय असणार याकडेही सगळ्यांचे लक्ष असेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS)भाजपाला पूरक भूमिका घेणार का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 22 मध्येही यंदाची निवडणूक ही चुरशीची मानण्यात येते आहे. गेल्या निवडणुकीत या ठिकाणी भाजपाने सरशी मिळवली होती, यंदाच्य़ा निवडणुकीत शिवसेना हे आव्हान पेलणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

प्रभाग क्रमांक 22

पारेख नगर, सुंदरपाडा, कांदिवली गावठाण पोईसर जिमखाना असे भाग मिळून हा प्रभाग आहे. विशेष करुन या भागातील मराठी मते कुणाला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. गेल्या निवडणुकीत हा प्रभाग महिला ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या प्रभागाच्या पूर्वेकडे पश्चिम रेल्वे आहे. तर उत्तरेकडे एमजी ओरड मथुरादास रोड आहेत. पश्चिमेकडे नाला आणि दामूअण्णा दाते रस्त्यापर्यंत हा प्रभग पसरेला आहे. या प्रभागातील एकूण लोकसंख्या ही 57643 इतकी असून यात 1299 एससी आणि 883 एसटी लोकसंख्या आहे.

2017 च्या निवडणुकीत काय झाले होते?

गेल्या महापालिका निवडणुकीत या ठिकाणी पाच उमेदवार रिंगणात होते. भाजपाच्या प्रियंका मोरे, काँग्रेसच्या नीलम मधाळे, मनसेच्या पायल घाडी, राष्ट्रवादीच्या मानवाचार्य पूजा कुणाल आणि शिवसेनेच्या सुवर्णा प्रसादे या रिंगणात होत्या. यात भाजपाच्या प्रियंका मोरे यांनी विजय मिळवला होता.

2017 च्या नगरसेविका

वॉर्ड क्रमांक 22 मधून 2017 साली भाजपाच्या प्रियंका मोरे यांनी विजय मिळवला होता.

या वेळी काय होईल?

2017 च्या निवडणुकीत एकूण 23957 मतांपैकी प्रियंका मोरे यांना 14570 मते मिळाली होती. शिवसेनेच्या सुवर्णा प्रसादे यांना 4313 , मनसेच्या पायल घाडी यांना 806 , काँग्रेसच्या निलम मधाळे यांना 2624 , तर राष्ट्रवादीच्या पूजा मन्वाचार्य यांना 1183 मते मिळाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची मते एकत्र आली तरी या ठिकाणी भाजपाला मात देणे सध्या तरी अवघड दिसते आहे. मात्र राजकीय गणिते काय असतील यावर सगळ्या बाबी ठरणार आहेत.

पक्षाचे नाव उमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर