BMC Election  2026 MNS Performance : म्हणूनच राज ठाकरे हरले असतील, भावाला मात्र मनापासून दिली साथ

BMC Election 2026 MNS Performance : 2022 साली शिवसेनेत दोन गट पडले. त्यामुळेत त्यांची अशी अवस्था झालीय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतही आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या पक्षाचे उमदेवार 25 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहेत.

BMC Election  2026 MNS Performance :  म्हणूनच राज ठाकरे हरले असतील, भावाला मात्र मनापासून दिली साथ
Uddhav-Raj Thackeray
| Updated on: Jan 16, 2026 | 4:22 PM

यंदाच्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होती ती ठाकरे बंधुंच्या युतीची. राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला, तेव्हापासून शिवसेनाच त्यांचा मुख्य स्पर्धक पक्ष राहिला आहे. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत घटलेला जनाधार लक्षात घेऊन दोन्ही ठाकरे बंधुंनी युती केली. ही युती केली. त्याने मनसेच्या वाट्याला 53 जागा आल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 164 जागा मिळाल्या. सर्वांनाच असं वाटलं की जागा वाटपात उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली. आता मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर होतोय, त्यातून जे सर्वांना वाटत होतं, ते चुकीचं नव्हतं हेच दिसून येतय. कारण दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येऊनही ते मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवू शकणार नाहीयत. मागच्या 25-30 वर्षांपासून मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. पण यंदा मुंबईकरांनी नवीन कौल दिलाय.

त्यानुसार मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसेल असं चित्र आहे. 2022 साली शिवसेनेत दोन गट पडले. त्यामुळेत त्यांची अशी अवस्था झालीय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतही आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या पक्षाचे उमदेवार 25 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहेत. पण या सगळ्यामध्ये मनसेला काय मिळालं? हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिकाच काय हेच लोकांना कळत नाही.

Live

Municipal Election 2026

07:19 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : राज्यातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट पहिली प्रतिक्रिया...

07:07 PM

Maharashtra Election Results 2026 : 17 पैकी 16व्या प्रभागात तीनही जागा काँग्रेसला

06:11 PM

मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी

05:45 PM

मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

07:16 PM

मुरलीधर मोहोळ निकाल येताच अजितदादांवर बरसले, पहिली प्रतिक्रिया काय?

राज ठाकरेंनी मारलेल्या कोलांट्या उड्या बघा

2006 साली मनसेची स्थापना झाली, त्यावेळी राज ठाकरे यांनी सर्व समावेशक भूमिका घेतली. पण त्यावेळच्या पालिका निवडणुकीत फक्त 7 उमेदवार निवडून आले.

त्यानंतर राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उचलला. त्यांच्या भूमिकेला मोठं जनसमर्थन मिळालं. परिणामी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे 13 उमेदवार निवडून आले.

2012 च्या पालिका निवडणुकीत मुंबईसह पुणे, नाशिकमध्ये मनसेचे चांगले नगरसेवक निवडून आले. नाशिकमध्ये मनसेचा महापौर झाला. पण त्यानंतर पक्षाची घसरण सुरु झाली, ती अजूनही सुरुच आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. त्याआधी लोकसभा निवडणुकीत ते मोदींसोबत होते. लोकसभेला उमेदवार फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेने विरोधात उभे केले.

2017 च्या पालिका निवडणुकीत मुंबईतून फक्त 6 नगरसेवक निवडून आले.

2019 येता, येता ते महाविकास आघाडीचे समर्थक बनले. त्यांनी आपला एकही उमेदवार उभा केला नाही. पण भाजप, मोदींविरोधात प्रचार केला. त्याचवर्षी विधानसभा निवडणुकीत फक्त एक उमेदवार निवडून आला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपच मोदींचं समर्थन केलं. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आलसा नाही.

2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली. यावेळी सुद्धा त्यांच्या पक्षाला दोन आकडी जागा मिळवता आलेल्या नाहीत. पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला भरपूर फायदा झाला.

राज ठाकरे यांच्या मनसेने मराठीच्या मुद्यावर पहिल्यांदा युतीमध्ये निवडणूक लढवली. पण त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना जास्त झाला.

राज ठाकरे हे 20 वर्षांपासून एका भूमिकेवर ठाम राहिलेले नाहीत. कदाचित यामुळे मतदारांचा त्यांच्या पक्षावर विश्वास नसावा. म्हणून या निवडणुकीतही त्यांच्या पक्षाला दोन आकडी जागा मिळताना दिसत नाहीयत.