“भाजपच्या या नेत्याविरोधात कोर्टात जाणार;” संजय राऊत यांचा ट्वीटमधून इशारा

| Updated on: Jan 24, 2023 | 5:50 PM

कोणत्याही पुराव्यांशिवाय चिखलफेक करणे हा एक उद्योग झाला आहे. कोर्टातचं लढणं हा आमच्या लोकांसमोर एकमेव पर्याय आहे. आम्ही तो लढा लढू, असं संजय राऊत यांनी म्हंटलं.

भाजपच्या या नेत्याविरोधात कोर्टात जाणार; संजय राऊत यांचा ट्वीटमधून इशारा
संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला. किरीट सोमय्या हे पोपटलाल आहेत. त्यांनी माझ्याविरोधात चुकीचे आरोप लावले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांविरोधात चिखलफेक करतात. त्यामुळं किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करेन, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमधून दिला. लवकरच मिस्टर पोपटलाल यांना लवकरचं कायदेशीर नोटीस पाठविणार असल्याचंही संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

प्रत्येकाला कोर्टात जाण्याचा अधिकार असतो. किरीट सोमय्या हे सगळ्यांवर चिखलफेक करतात. मी स्वतः पुराव्यांसह कोर्टात जातो. ते सध्याच्या या पाच-सहा वर्षांच्या काळात सुरूच राहणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

पुराव्याशिवाय चिखलफेक करणे हा उद्योग

कोणत्याही पुराव्यांशिवाय चिखलफेक करणे हा एक उद्योग झाला आहे. कोर्टातचं लढणं हा आमच्या लोकांसमोर एकमेव पर्याय आहे. आम्ही तो लढा लढू, असं संजय राऊत यांनी म्हंटलं.

कोर्टात येणं-जाणं सुरूच राहते. माझ्याविरोधात कोर्टात खटला दाखल केला. त्याचा जबाब आम्ही कोर्टातच देणार आहोत. कोर्टात आलो आहोत.

पोपटलाल काय वाईट नाव?

पोपटलाल काही वाईट नाव आहे का. मी ट्टीट केलंय. मी कोर्टात जात आहे. आणखी काही लोकं कोर्टात जाणार आहेत. आता त्यांना कायदेशीर कोर्टातच जबाब देणार असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं घेरलं का, असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, घेरलं असेल, तर घेराव मोडून काढू. जे होईल त्याला सामोरे जाऊ, असंही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.