AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant: राजकारणात ‘पुष्पा’स्टाईलची नाही गरज, आम्ही जन्मापासूनच… मंत्री उदय सामंत यांचा कुणाला टोला?

Uday Samant comment on Pushpa Style: देशभरात पुष्पा या चित्रपटाने मोठी गर्दी खेचली. या चित्रपटातील झुकेगा नही...या संवादाने तर कहर केला आहे. अनेकांच्या तोंडी हा डायलॉग सहज येतो. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावरूनच त्यांच्या विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.

Uday Samant: राजकारणात 'पुष्पा'स्टाईलची नाही गरज, आम्ही जन्मापासूनच... मंत्री उदय सामंत यांचा कुणाला टोला?
झुकेगा नही....Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Mar 14, 2026 | 1:25 PM
Share

Uday Samant comment on Pushpa Style: पुष्पा चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतले. या सिनेमातील गाणी, डायलॉगने तुफान आणली. झुकेगा नही…या डायलॉगची एकच क्रेझ तयार झाली. ज्याच्या तोडीं हा संवाद दिसू लागला. अभिनेता अल्लू अर्जुनची हनवटीवरून हात फिरवत म्हणतानाची स्टाईल अबालवृद्धांना आवडली. आता नेमका हाच धागा पकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या विरोधकांना खास टोला हाणला आहे. त्याची सध्या चर्चा सुरू आहे.

राजकारणात ‘पुष्पा’ स्टाईलची गरज नाही

राजकारणात ‘पुष्पा’ स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही,अशी फटकेबाजी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगलीत केली. त्यांनी शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे आक्रमकता आहे. सध्या सगळीकडे ‘पुष्पा’ चित्रपटाची चर्चा असते, पण आम्हाला चित्रपटातल्या सारखं ‘झुकेगा नही’ म्हणण्याची गरज नाही. कारण आम्ही जन्मापासूनच कोणासमोर झुकलेलो नाही,” अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला. शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीच्या वाळवा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

मुंबई पालिकेच्या ठेवीत दीड हजार कोटींची भर

कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या ठेवी 91 कोटींपर्यंत पोहचल्या होत्या. त्यानंतर मुंबईत अनेक पायाभूत प्रकल्प सुरू झाले. त्यासाठी पैसा खर्च झाला. 2025 मध्ये या ठेवी 79 हजार 498 कोटींवर आल्या. मात्र यंदा पालिकेच्या ठेवीत दीड हजार कोटींची वाढ होऊन त्या 81 हजार 134 कोटींवर पोहचल्याचे प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना दिले.

उद्योग बंद पडू देणार नाही

दरम्यान राज्यात सुरू असलेल्या एलपीजी, सीएनजी आणि उद्योगासाठी आवश्यक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक एमआयडीसीतील उद्योग संकटात सापडले आहेत. याविषयी बोलताना राज्यातील उद्योग बंद पडू देणार नाही असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच उद्योजकांच्या समस्यांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...