‘टीव्ही 9 मराठी’ इम्पॅक्ट, वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

‘टीव्ही 9 मराठी’ इम्पॅक्ट, वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक


मुंबई : उल्हासनगरमध्ये वृद्ध महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या महिला चोराला पोलिसांनी अखेर अटक केली. ‘टीव्ही 9 मराठी’ने या घटनेची बातमी दाखवली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत या चोरट्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पोलीस या महिलेचा छडा लावण्यात यशस्वी ठरले.

गेल्या 7 मे रोजी उल्हासनगरमध्ये एका 80 वर्षांच्या वृद्ध महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या चोरल्याची घटना घडली होती. वृद्ध महिलेला मंदिरात सोडते असं सांगून एका महिलेने त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या हिसकावून घेतल्या आणि तिथून पळ काढला. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 येथील संतोषी माता मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

‘टीव्ही 9 मराठी’ने या चोरट्या महिलेची बातमी दाखवली होती. ‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीची दखल घेत उल्हासनगर पोलिसांनी हे प्रकरण हाती घेतलं. पोलिसांनी या चोरट्या महिलेला शोधण्यासाठी तब्बल 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली. या महिलेवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी चोरी झालेल्या सोन्याच्या बांगड्याही हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास सुरु आहे.

पाहा व्हिडीओ :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI