VIDEO : जॉब नसल्याने आठव्या मजल्यावरुन उडी घेत महिलेची आत्महत्या, थरकाप उडवणारा व्हिडीओ

कांदिवली पश्चिम येथे एका 40 वर्षीय महिलेने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या (Women suicide kandivali) केली. ही घटना आज (2 जानेवारी) चारकोप येथे घडली.

VIDEO : जॉब नसल्याने आठव्या मजल्यावरुन उडी घेत महिलेची आत्महत्या, थरकाप उडवणारा व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Jan 03, 2020 | 12:11 AM

मुंबई : कांदिवली पश्चिम येथे एका 40 वर्षीय महिलेने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या (Women suicide kandivali) केली. ही घटना आज (2 जानेवारी) चारकोप येथे घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत. डिंपल वाडीलाल असं या मृत (Women suicide kandivali) महिलेचं नाव आहे.

या 40 वर्षीय महिलेने रॉक अॅव्हेन्यू इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. महिला आठव्या मजल्यावरुन उडी मारत आहेत. तर खाली काही लोक तिला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण या दरम्यान महिलेने उडी घेत आत्महत्या केली.

“गेल्या काहीदिवसांपासून डिंपलकडे जॉब नव्हता. त्यामुळे ती ड्रिप्रेशनमध्ये गेली होती. तसेच तिचे लग्नही झाले नव्हते”, असं डींपलच्या आईने सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळावरुन डींपलचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची अधिक चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.