AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाळीसगावच्या चोराने पाठीत खंजीर खुपसला – ठाकरे गटाच्या नेत्याचे टीकास्त्र

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताचा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण मात्र जोरात सुरू झालं आहे. दरम्यान महाविकास आघआडीकडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, चाळीसगाव मतदारसंघही त्यापैकीच एक. ठाकरे गटाच्या उमेदवाराने टीकास्त्र सोडलं आहे.

चाळीसगावच्या चोराने पाठीत खंजीर खुपसला - ठाकरे गटाच्या नेत्याचे टीकास्त्र
| Updated on: Oct 28, 2024 | 8:15 AM
Share

विधानसभा निवडणुका जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होईन अखेर आता उमेदवारांच्या नावांची लिस्ट जाहीर होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली असून महायुतीलाच पुन्हा सत्ता मिळते की मविआ सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतं याचा निकाल 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. मात्र निवडणुकीची घोषणा होताचा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण मात्र जोरात सुरू झालं आहे. दरम्यान महाविकास आघआडीकडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, चाळीसगाव मतदारसंघही त्यापैकीच एक. चाळीसगाव येथीस जागेवर ठाकरे गटाच्या उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आलं असून पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारावर कडाडून टीकास्त्र सोडलं आहे.

या चाळीसगावचा जो चोर आहे त्याने देखील माझ्या पाठीत खंजीर खुपसला अशी जोरदार टीका उन्मेष पाटील यांनी महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्यावर केली.

काय म्हणाले उन्मेष पाटील ?

महाराष्ट्रातील 40 गद्दार हे पवार साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून गेलेच, ते संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने बघितलं. पण त्याच यादीत आणखीही एक, अलीबाबा म्हणून चाळीसगावच्या चोराने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणून या अलीबाबाला हद्दपार करण्यासाठी चाळीसगावच्या नवीन क्रांतीचे पर्व आपण सुरु करत आहेत. अशा शब्दांत ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी भाजपचे आमदार तसेच चाळीसगाव विधानसभेचे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या वर टीकास्त्र सोडलं.

एक नालायक मित्र निघाला मी त्याला धन्यवाद देईल त्याने माझी उमेदवारी कापली. त्यांच्यामुळे मला महाविकास आघाडीचे घटक होता, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन. तुम्ही तिकीट कापलं त्यामुळे स्वाभिमानाने शिवबंधन बांधत मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. नालायक मित्र गेल्याचं दुःख मला नाही, परंतु राजूदादा सारखा मला मोठा भाऊ मिळाला त्याचं समाधान मला आहे, असे पाटील म्हणाले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा