Nagar Parishad election Result 2025 : भाजप प्रत्येक निवडणुकीत विजयी का होतो? रहस्य काय? नगर परिषद निवडणुकीतून आली ही 5 कारणे समोर

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत, या निवडणुकीत महायुतीला दणदणित यश मिळालं आहे, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, राज्यात भाजपाचे तब्बल 117 नगराध्यक्ष निवडून आले आहेत.

Nagar Parishad election Result 2025 :  भाजप प्रत्येक निवडणुकीत विजयी का होतो? रहस्य काय? नगर परिषद निवडणुकीतून आली ही 5 कारणे समोर
नगर परिषद निवडणूक निकाल
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 21, 2025 | 2:34 PM

नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. राज्यात महायुतीचे तब्बल 215 नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. तर 24 ठिकाणी स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, एकट्या भाजपचे राज्यात 119 नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर शिवसेना 60 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 36 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे 32  नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत, सर्वात जास्त फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला असून, शिवसेना ठाकरे गटाचे राज्यात केवळ 9 च नगरसेवक निवडून आले आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत देखील भाजपला दणदणित यश मिळालं होतं, राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील भाजपनं मोठं यश मिळवलं आहे, भाजप निवडणुकीत नेहमीच विजयी का होतो? नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाच कारणं समोर आले आहेत, कोणती आहेत ती कारण जाणून घेऊयात.

लाडकी बहीण योजना – लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा याही निवडणुकीत जादू चालल्यांच पहायला मिळालं आहे.  महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं आहे. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा हा भाजपला आणि महायुतीला झाला आहे.

प्रचाराचं  नियोजन – निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची भाजपच्या प्रचाराचं नियोजन हे नेहमीच काटेकोर आणि शिस्तबद्ध राहिलं आहे. भाजप नेहमीच बुथ पातळीवर नियोजन करते, त्याचा फायदा त्यांना प्रत्येक निवडणुकीत होतो.

युतीचा निर्णय – भाजपने या निवडणुकीत काही ठिकाणी महायुतीमधील पक्षांसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती केली, तसेच ज्या ठिकाणी इतर पक्षांचं प्राबल्य होतं, त्यांच्यासोबत युती केली, भाजपच्या या लवकचिक धोरणामुळे त्यांना मोठं यश मिळालं.

फडणवीस प्रचाराच्या रिंगणात – या निवडणुकीत विजयाचं आणखी एक मोठं कारण म्हणजे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे या निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी अनेक सभा घेतल्या, त्यामुळे निवडणुकीत फायदा झाला.

निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी – भाजपकडून उमेदवारांना मेरिट लिस्टवरच उमेदवारी देण्यात आली त्याचाही मोठा फयदा झाला.