AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 हजारात फिक्स व्हायचं… ॲपवर ठरायचं, दिल्लीच नव्हे उझबेकिस्तानच्या तरुणी… आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटने नागपुरात खळबळ

नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. 'लॉग इन पर्सनल मिटिंग' अॅपद्वारे चालणाऱ्या या रॅकेटमधून उझबेकिस्तानसह दिल्ली, पंजाब, कोलकाता येथील महिलांची सुटका करण्यात आली. 15 हजार रुपयांत ग्राहक उपलब्ध करून देणाऱ्या या रॅकेटचा सूत्रधार अटकेत असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

15 हजारात फिक्स व्हायचं... ॲपवर ठरायचं, दिल्लीच नव्हे उझबेकिस्तानच्या तरुणी... आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटने नागपुरात खळबळ
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 13, 2026 | 9:31 AM
Share

नागपूर एका आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटने हादरले आहे. नागपूरच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रेड मारून देश-विदेशात पसरलेल्या ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत एका दलालासह पाच महिलांची सुटका केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी मुख्य सूत्रधार असून समीर ऊर्फ मनीष ऊर्फ गगन ठाकूर, राहुल आणि पूजा हे फरार आहेत. महिलांमध्ये उझबेकिस्तानच्या दोन, तर दिल्ली, पंजाब आणि कोलकात्यातील प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे आरोपी लॉग इन पर्सनल मिटिंग नावाच्या ॲपद्वारे ग्राहकांना महिला उपलब्ध करून द्यायचे. आरोपी ‘मीटिंग’ नावाच्या ॲपद्वारे ग्राहकांना 15 हजार रुपयांत महिला पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच महिलांना कमी वेळात अधिक पैसा कमावण्याची लालच दाखवून त्यांना या शरीर विक्रय करायला सांगायचे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत सचिनला विदेशी महिलेसह पकडण्यात आले. त्यानंतर दोन हॉटेलांवर छापे टाकून आणखी चार महिलांना ताब्यात घेण्यात आले.

ग्राहक बनून गेले

सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी बोगस ग्राहक बनून गोळपेठेतील हॉटेल पटेल इनमध्ये गेले. पंचांसमोर त्यांनी या हॉटेलात धाड मारली आणि कारवाई केली. या धाडीत पोलिसांनी 5.18 लाख रुपयांचा माल जप्त केला. मोबाईल आणि पाच लाख किंमत असलेली स्विफ्ट डिजायर कार आणि 8 हजार रुपये रोख रक्कम आदी मुद्देमाल जप्त केला असून अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील पोलिसांनी समीर ऊर्फ मनीष ऊर्फ गगन ठाकूर, राहुल आणि पूजा नावाच्या महिलेसहीत तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

फरार आरोपींचा शोध

या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143 (2) (3) तसेच अनैतिक व्यापार (निवारण) अधिनियम 1956च्या कलम 3,4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ