AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे मुंबईला रवाना, नागपुरात समर्थकांची घोषणाबाजी, बदलीविरोधात चीड

तुकाराम मुंढे मुंबईला रवाना होण्यापूर्वी नागपुरात सरकारी निवासस्थानासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली. 

तुकाराम मुंढे मुंबईला रवाना, नागपुरात समर्थकांची घोषणाबाजी, बदलीविरोधात चीड
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 11, 2020 | 10:46 AM
Share

नागपूर : नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात सर्वसामान्य जनता आक्रमक होणं नवीन नाही. मुंढे मुंबईला रवाना होण्यापूर्वी नागपुरातही हेच चित्र पाहायला मिळालं. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सरकारी निवासस्थानासमोर लोकांनी मोठी गर्दी केली. (Nagpur Citizens protest against IAS Officer Tukaram Mundhe transfer)

मुंढे यांच्या बदलीच्या विरोधात नागपूरचे रहिवासी आक्रमक झाले. तुकाराम मुंढे यांच्या घराबाहेर लोकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलीसांनाही पाचारण करण्यात आलं. लोकांनी गर्दी कमी करावी, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळावं, यासाठी पोलीस आणि मुंढे समर्थकांमध्ये बाचाबाचीसुद्धा झाली.

कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने अवघ्या 15 दिवसात हे आदेश मागे घेतले. आता त्यांची नियुक्ती नेमकी कुठे केली जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या आदेशानंतर त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांनी नागपूरकरांचे आभार मानले. “अब मै चल पडा मेरे राह की ओर….”अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचा निरोप घेतला.

तुकाराम मुंढे यांची फेसबुक पोस्ट 

“नागपुरात सात महिने राहिल्यानंतर मी तुमचा निरोप घेत आहे. या सात महिन्यात मी या शहराला उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रकल्प पूर्ण झाले. काही सुरु आहेत. तर काही अद्याप सुरु झालेले नाहीत. मात्र त्यातच माझी ट्रान्सफर झाली. अब मै चल पडा मेरे राह की ओर…. या नियमानुसार मी पुढील कामकाजासाठी सर्वांचा निरोप घेत आहे.

नुकतंच कोव्हिड विषाणूच्या संक्रमाणातून मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्याप्रती असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकवणारा ठरला. कोव्हिड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकाराचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला, याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही. (Nagpur Citizens protest against IAS Officer Tukaram Mundhe transfer)

जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जिथे कुठे असेन, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला Good bye. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल Thank you…! अलविदा…!” अशी पोस्ट तुकाराम मुंढे यांनी दिली.

जानेवारी महिन्यातच नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात त्यांची पुन्हा एकदा ट्रान्स्फर ऑर्डर निघाली. आता त्याला पुन्हा एकदा ब्रेक बसला आहे. तर त्यांच्याकडे असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कारभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

तुकाराम मुंढे यांना बदलीनंतर देण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या : 

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द

डर जरुरी है! तुकाराम मुंढे हजर होण्यापूर्वीच कर्मचारी वेळेत येण्यास सुरुवात!

(Nagpur Citizens protest against IAS Officer Tukaram Mundhe transfer)

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद