नागपुरात 10 झोनमध्ये 6 हजार सुपर स्प्रेडर्सची तपासणी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेचं पाऊल

| Updated on: May 16, 2021 | 6:58 PM

नागपूर महापालिकेकडून बाजारपेठा, बँक, शासकीय आणि खासगी कार्यालये, दुकाने इत्याठी ठिकाणी 'सुपर स्प्रेडर्स'ची कोरोना चाचणी करण्यात आलीय.

नागपुरात 10 झोनमध्ये 6 हजार सुपर स्प्रेडर्सची तपासणी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेचं पाऊल
नागपूर महापालिका
Follow us on

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या घटली असली तर चिंता कायम आहे. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपूर महापालिकेकडून बाजारपेठा, बँक, शासकीय आणि खासगी कार्यालये, दुकाने इत्याठी ठिकाणी ‘सुपर स्प्रेडर्स’ची कोरोना चाचणी करण्यात आलीय. महापालिकेच्या 10 झोनमध्ये ही चाचणी केली गेली. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून 6 हजारापेक्षा जास्त नागरिकांची चाचणी करण्यात आली. यासाठी 11 मोबाईल व्हॅन आणि 45 चाचणी केंद्रांचा उपयोग करण्यात आला. (Corona test of 6000 super spreaders in Nagpur)

महापालिकेकडून सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पथकासह व्यतिरिक्त आता नवे 10 पथकं चाचणीसाठी तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून लहान मुलं, मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांची चाचणी करण्यात येणार आहे. नागपुरात मधल्या काळात कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक बनली होती. तसंच मृत्यूचं प्रमाणही भीतीदायक बनलं होतं. पण आता परिस्थिती काहीशी आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अशावेळी महापालिकेकडून खबरदारी म्हणून सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्यात येत आहे.

नागपुरातील कोरोना स्थिती –

नागपूरला कोरोना संकटाच्या काळात आज मोठा दिलासा मिळालाय. कोरोना मृत्यूची संख्या कमी झालीय. तर बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नागपूर जिल्ह्यात आज 4 हजार 519 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. तर 1 हजार 133 जणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका – नितीन राऊत

नागपूरसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. पण म्हणून सुखावून जाऊ नका. कोरोनाची तिसरी लाट दारावर आहे. मास्टर प्लान करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. गेल्या वर्षभरात सतराशे बेडवरून सुमारे 9 हजार बेड आम्ही निर्माण केले. मोठ्या प्रमाणात कोविड हॉस्पिटलची सुरुवात केली. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता होईल यासाठी थेट हवाईदलापासून रेल्वे पर्यंत मदत घेतली. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. आरोग्यविषयक मनुष्यबळातही वाढ केली आहे. वर्षभरात केवळ आरोग्यावर काम सुरू असून नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक दशलक्ष रुग्णसंख्येमागे साधारण बेड, आयसीयू बेडसह व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांना मागे सोडले आहे. मात्र तरीही तज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या मते येणारी तिसरी लाट ही अतिशय गंभीर असेल. यामध्ये ही यंत्रणा देखील तोकडी पडू शकते. त्यामुळे युद्धस्तरावर कामाला लागा. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा, असे आदेश नितीन राऊत यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिले होते.

संबंधित बातम्या :

20 वर्षांपासून बंद रुग्णालयात आता 300 रुग्णांवर उपचार, भाजप-संघ स्वयंसेवकांची कमाल; 15 दिवसात उभारलं कोविड सेंटर

Beed Lockdown : बीडमध्ये दहा दिवस कडक लॉकडाऊन वाढवला, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Corona test of 6000 super spreaders in Nagpur