Nagpur Corona Update : नागपुरातील मृत्यूदर चिंताजनक, दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू

| Updated on: Apr 15, 2021 | 8:10 PM

नागपुरातील मृत्यूदर दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललाय. नागपुरात आज दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Nagpur Corona Update : नागपुरातील मृत्यूदर चिंताजनक, दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू
कोरोनामुळे नागपुरात होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
Follow us on

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना स्थिती गंभीर बनली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरातील रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे. नागपुरातील मृत्यूदर दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललाय. नागपुरात आज दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. (Death rate in Nagpur is alarming, with 78 deaths today)

नागपुरात गेल्या 24 तासांत 74 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 813 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 4 हजार 634 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आजच्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 99 हजार 849 वर पोहोचलीय. त्यातील 2 लाख 32 हजार 705 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरातील मृत्यूच्या संख्येनं आता 6 हजारांचा आकडा पार केलाय. नागपुरातील एकूण मृतांची संख्या 6 हजार 34 वर जाऊन पोहोचली आहे.

नागपुरातील रुग्णालयात विदारक चित्र

नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील विदारक स्थिती समोर आली आहे. बेड नसल्याने मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या पोर्चमध्ये जमिनीवर झोपवून ऑक्सिजन दिले जात आहे. एका बेडवर कोरोनाच्या दोन रुग्णांवर सुरु उपचार आहे. गेल्या 10 दिवसांपासून मेडिकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मेडिकलच्या बाहेरही फुटपाथवर रुग्ण झोपले. नागपुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून जिल्ह्यातील व्हेंटीलेटर्स बेड संपले आहेत.

पोर्चमध्ये जमिनीवर झोपवून उपचार

नागपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ताण आल्याचं चित्र आहे. नागपूरमधील मेडिकल रुग्णालयामध्ये रुग्णांना ट्रामा केअर सेंटरच्या पोर्चमध्ये झोपवून उपचार करण्याची वेळ ओढावली आहे. तर एका बेडवर दोन दोन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. तर मेडिकल रुग्णालयाच्या बाहेर देखील रुग्ण झोपल्याचं चित्र आहे.

नितीन गडकरींनी घेतली महत्वाची बैठक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यातील कोविड स्थितीसंदर्भात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. विदर्भात पुढील 48 तासांत मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणे, त्याचबरोबर हिंगणा एमआयडीसीत ताबडतोब ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सरकारी परवानग्या आणि रेडटेपीजममध्ये दवाखाने आणि वैद्यकीय यंत्रणेला फसू न देता ताबडतोब निर्णय घेऊन लोकांना मदत पोहचवण्याचे स्पष्ट निर्देश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

संबंधित बातम्या :

नितीन गडकरी रेमडेसिव्हीरसाठी मैदानात, सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीशी चर्चा, एका फोनवर 4 हजार इंजेक्शनची सोय

Remdesivir : नागपुरात एक्सपायरी डेट संपलेल्या बाटल्यांवर नवं स्टिकर लावून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री

Death rate in Nagpur is alarming, with 78 deaths today