AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking – पिंपरी चिंचवडमधील सर्व अनधिकृत बांधकामं नियमित करणार

पिंपरी चिंचवडमधील सर्व अनधिकृत बांधकामं नियमित करणार...

Breaking - पिंपरी चिंचवडमधील सर्व अनधिकृत बांधकामं नियमित करणार
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 21, 2022 | 3:58 PM
Share

नागपूर : पिंपरी चिंचवडमधील सर्व अनधिकृत बांधकामं नियमित करणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. शिवाय अनधिकृत बांधकामांना (Pimpri Chinchwad Unauthorized Constructions) लावण्यात येणारा शास्ती करही रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरीतील बांधकाम व्यावसायिकांना हा मोठा दिलासा आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये करवसूलीबाबत सरकारला वेगळा अनुभव आलाय. अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर भरताना लोक मागे-पुढे पाहतात. त्यामुळे कर भरला जात नाही. त्याचा परिणाम इतर करांवरही होतोय. इतर कर जमा होतानाही अडचणी येत आहेत, असं लक्षात आलं आहे. त्यामुळे शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापासून पिंपरी चिंचवडच्या अनधिकृत बांधकामांना हा कर लागू असणार नाही, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शास्तीकराची रक्कम जास्तीची आहे. ही रक्कम मूळ करापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे ही रक्कम भरताना अनेजण टाळाटाळ करतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीलाही मोठा फटका बसतो. त्यामुळे हा शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारने सरकारी शाळांबाबत मोठा निर्णय घेतलाय. सरकारी शामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देवेंद्र फडवणीस यांनी विधिमंडळात बोलताना हा शासन निर्णय सांगितला.

सायबर गुन्ह्यांबाबत सायबर इंटेलिजन्स युनिट प्रोजेक्ट प्रस्तावित करण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या कमी व्हावी, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली आहे.

विधिमंडळाचं हिवाळी आधिवेशन सध्या सुरू आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यात पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांचा मुद्दाही चर्चिला गेला.

Follow Us
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ