AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : बुलढाण्यात खासगी बसचा नेमका अपघात कसा झाला?, मध्यरात्री काय घडले; अंगावर शहारे येणारी माहितीसमोर

समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Video : बुलढाण्यात खासगी बसचा नेमका अपघात कसा झाला?, मध्यरात्री काय घडले; अंगावर शहारे येणारी माहितीसमोर
bus burstImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 01, 2023 | 8:34 AM
Share

बुलढाणा : नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या यवतमाळच्या विदर्भ ट्रॅव्हल्सचा मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावात हा भीषण अपघात झाला. बस डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर बसने पेट घेतला आणि त्यात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हरसह 8 जण बचावले आहेत. ही खासगी बस दरने नामक व्यक्तीची असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या बसमधून यवतमाळमधील दोनजण प्रवास करत होते. बस चालक आणि क्लिनरही यवतमाळ जिल्ह्यातीलच असल्याचं सांगितलं जात आहे.

पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर रात्री एक ते दीडच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनीही घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अपघात नेमका कसा झाला याची माहिती दिली. अपघाताची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसचा टायर फुटला. त्यामुळे बस खांबाला जाऊन धडकली. त्यानंतर ही बस अनियंत्रित झाली आणि समृद्धी महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन आदळली. त्यामुळे बस पलटी झाली. बस पलटी होताच बसला भीषण आग लागली. बस पलटल्याने बसचा दरवाजाही तुटला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडणं कठिण झालं. परिणामी 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ प्रवाशी वाचले, अशी माहिती संजय सक्सेना यांनी दिली.

सर्व प्रवासी तीन जिल्ह्यातील

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत आणि जखमी हे यवतमाळ, नागपूर आणि वर्धा येथील रहिवाशी असल्याचंही त्यांनी सांगितलं. बसचा चालक आणि क्लिनरही यवतमाळचे असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

वाहतुकीची कोंडी

हा अपघात झाल्यानंतर समृद्धी महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर वाहतूक पोलिसांनाही पाचारण केलं. वाहतूक पोलिसांनी क्रेन मागवली असून बस बाजूला करण्याचं काम सुरू आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

प्रवाशींची ओळख पटेना

दरम्यान, या अपघातातील मृतांची ओळख पटणं मुश्कील झालं आहे. कारण मृतांचे चेहरे जळून गेले आहेत. त्यांच्या अंगावरचे कपडेही जळून गेले आहेत. मृतांचे सामानही जळून खाक झाले आहे. कोणाताही आयडी प्रूफ शिल्लक नसल्याने या मृतांची ओळख पटणं मुश्किल झालं आहे. ट्रॅव्हल्स कंपनीकडील प्रवाशांची यादी घेऊन या मृतांची ओळख पटवली जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांना पाचारण करण्यात आलं असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

अजित पवारांकडून शोक

बुलढाण्यातील घटनेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 26 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे, असं अजित पवार म्हणाले.

अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, अशा शब्दातअजित पवार यांनी अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.