NMC | नागपूर मनपात आणखी एक नवा घोटाळा उघडकीस, जन्म-मृत्यू विभागातील काय आहे प्रकरण? वाचा

जन्म मृत्यू विभागात 1 कोटी 10 लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. या संबंधीची माहिती समोर आली आहे. आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून केवळ कर्मचार्‍यांना नाही तर अधिकार्‍यांवर कारवाई करीत त्यांना निलंबित करावे, अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती विजय झलके यांची केली.

NMC | नागपूर मनपात आणखी एक नवा घोटाळा उघडकीस, जन्म-मृत्यू विभागातील काय आहे प्रकरण? वाचा
नागपूर महापालिका
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 5:57 AM

नागपूर : नागपूर मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात नवा घोटाळा उघडकीस आला आहे. यापूर्वी स्टेशनरी आणि प्रिंटिंग साहित्यात घोटाळा झाल्याचं उघडकीस आल होतं. या प्रकरणी कर्मचाऱ्यांना निलंबित करून मोठ्यांना वाचविण्याचे प्रयत्न झालेत. स्टेशनरी घोटाळ्यात चार कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. परंतु, मोठ्या माशांना वाचविण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय झलके यांनी पत्रकार परिषदेत केला.

घोटाळ्यात चार कर्मचारी निलंबित

महापालिकेच्या विविध विभागांसह झोन कार्यालयांना पुरवठा करण्यात आलेल्या स्टेशनरी व प्रिटिंग साहित्यात 67 लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यांच्यासह सहा जणांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. 67 लाखांच्या स्टेशनरी घोटाळा प्रकरणी चार कर्मचारी निलंबित करण्यात आली आहेत. यात वित्त व लेखा विभागातील लेखाधिकारी राजेश मेश्राम, ऑडिटर अफाक अहमद, एस. वाय. नागदिवे व मोहन पववंशी आदींचा समावेश आहे. यासोबतच मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजय झलके यांनी केली आहे. तर गुरुवारी या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंत्राटदार साकोरे आणि कुटुंबीयांना अटकेची शक्यता

महापालिकेच्या विविध विभागांना मनोहर साकोरे व त्यांच्या नातेवाईकांच्या फर्मच्या माध्यमातून स्टेशनरीचा पुरवठा केला जातो. यात मनोहर साकोरे अँड कंपनी, स्वस्तिक ट्रेडिंग, गुरूकृपा स्टेशनरी, एस. के. एन्टरप्रायजेस व सुदर्शन आदी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी आरोग्य विभागाला कोविड कालावधीत साहित्याचा पुरवठा न करता बील उचलण्यात आल्याचा प्रकार आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या निदर्शनास आला. डॉ. चिलकर यांनी सदर पोलिस ठाण्यात गुरुवारी तक्रार केली. तक्रारीनंतर पुरवठादार पदमाकर (कोलबा) साकोरे, सुषमा साकोरे, मनोहर साकोरे व अतुल साकोरे यांनी स्टेशनरी साहित्यात 67 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केलाय. त्यामुळं त्यांच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. पुरवठादाराला अटक झाल्यानंतर सामान्य प्रशासन व लेखा विभागातील अधिकार्‍यांची चौकशी केली जाणार आहे.

जन्म मृत्यू विभागात 1 कोटीचा घोटाळा

जन्म मृत्यू विभागात 1 कोटी 10 लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. या संबंधीची माहिती समोर आली आहे. आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून केवळ कर्मचार्‍यांना नाही तर अधिकार्‍यांवर कारवाई करीत त्यांना निलंबित करावे, अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती विजय झलके यांची केली. राधा स्वामी सत्संग येथे पाच हजार खाटांचे कोविड रुग्णालय तयार करण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वस्तुची खरेदी करण्यात आली होती. आता ते साहित्य कुठे आहे, याची प्रशासनाकडे माहिती नाही. अनेक खरेदीचे प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी न येता परस्पर प्रशासन पातळीवर काही ठराविक कंत्राटदाराच्या माध्यमातून खरेदीचे व्यवहार करण्यात आले आहे. हा केवळ सामान्य प्रशासन विभागाचा घोटाळा नाही तर आरोग्य विभागसुद्धा या भ्रष्टाचारामध्ये आहे.

Nagpur crime | कामाच्या शोधात शहरात आला, सारखे आडनाव असल्यानं दिला आसरा, त्याने केली तिची बदनामी आणि…

Nagpur ACB | सहायक शिक्षकाला नियमित करण्यासाठी मागितले साडेसहा लाख, 50 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिकेस अटक