Nagpur ACB | सहायक शिक्षकाला नियमित करण्यासाठी मागितले साडेसहा लाख, 50 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिकेस अटक

20 हजार रुपये महिन्याच्या वेतनात 50 हजार रुपयांचा हप्ता भरण संबंधित शिक्षकाला शक्य नव्हतं. त्यामुळं संबंधित शिक्षकानं संचालक व मुख्याध्यापिकेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं केली.

Nagpur ACB | सहायक शिक्षकाला नियमित करण्यासाठी मागितले साडेसहा लाख, 50 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिकेस अटक
पालघरमध्ये वन विभागाच्या परिक्षेत्र अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 3:01 PM

नागपूर : सहायक शिक्षकाला नियमित करण्यासाठी साडेसहा लाख रुपये मागण्यात आले. अतिरिक्त होण्याची भीती या शिक्षकाला दाखविण्यात येत होती. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्यानं संबंधित शिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं गेला. एसीबीनं सापडा रचून संचालक भामराज मेश्राम व मुख्याध्यापिका शांतशीला मेश्राम यांना अटक केली. खापरखेडा येथे मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

शाळा आली होती 40 टक्के अनुदानावर

पारशिवनी तालुक्यातील करभांड येथे तथागत विद्यालय आहे. या विद्यालयात तक्रारदार शिक्षक कार्यरत आहेत. ही संस्था संचालित करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष भामराज दौलतराव मेश्राम आहेत. तर त्यांची पत्नी शांतशीला मेश्राम या विद्यालयात मुख्याध्यापिका आहेत. संबंधित शिक्षकाला मुख्याध्यापिका शाळेतील हजेरी पटावर स्वाक्षरी करू देत नव्हती. जानेवारी महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. ही शाळा 40 टक्के शासकीय अनुदानावर आली आहे. परंतु, गैरहजेरी लागल्यानं संबंधित शिक्षक हा अतिरिक्त व अनियमित ठरणार होता. तो शाळेत नियमित ठरावा, यासाठी तक्रारदाराला सहा लाख 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. परंतु, 20 हजार रुपये महिन्याच्या वेतनात 50 हजार रुपयांचा हप्ता भरण संबंधित शिक्षकाला शक्य नव्हतं. त्यामुळं संबंधित शिक्षकानं संचालक व मुख्याध्यापिकेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं सोमवारी केली.

आरोपींना पोलीस कोठडी

एसीबीचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी तक्रारीची खात्री करून सापळा रचला. तक्रारदार 50 हजार रूपये देण्यासाठी भामराज मेश्राम यांच्या खापरखेडा येथील घरी गेले. यावेळी एसीबीचे पथक दबा धरून बसले होते. भामराज आणि शांतशीला यांनी पैसे घेताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्या विरूध्द खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 16 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सुनील कळंबे, सारंग बालपांडे, सुशील यादव, बबीता कोकर्डे, गीता चौधरी, करूणा सहारे, अमोल भक्ते यांनी केली.

Nagpur | तीन लाखांचा नायलॉन मांजा जप्त, विक्रीवर बंदी तरीही बाजारात कसा?

Vedio – Nagpur | इंटर्नशीपच्या काळातील शिकवणी शुल्क रद्द करा, व्हेटरनरी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

NMC | नागपूर मनपात 67 लाखांचा स्टेशनरी घोटाळा!; सहा जणांना नोटीस, वित्त व लेखा अधिकाऱ्यांचा समावेश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.