Vedio – Nagpur | इंटर्नशीपच्या काळातील शिकवणी शुल्क रद्द करा, व्हेटरनरी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

शिक्षकांना मागील तीन वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. परंतु, फक्त आश्वासन दिलं जातं. प्रत्यक्ष विद्यापीठाकडून कृती होताना दिसत नाही. त्यामुळं हे आंदोलन केल्याचं विद्यार्थी सांगतात.

Vedio - Nagpur | इंटर्नशीपच्या काळातील शिकवणी शुल्क रद्द करा, व्हेटरनरी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
नागपूर व्हेटरनरी कॉलेजबाहेर आंदोलन करताना विद्यार्थी.
गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 16, 2021 | 12:51 PM

नागपूर : व्हेटरनरी कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पावित्रा घेतला. ज्या महाविद्यालयात ते शिकतात, त्याच महाविद्यालयाची गेट आज त्यांनी बंद केली. कारण इंटर्नशीपच्या काळातील शिकवणी शुल्क रद्द करण्यात यावं, अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे.

दरवर्षी 14 हजार कशाचे?

नागपूर व्हेटरनरी कॅालेजचं मुख्य गेट विद्यार्थ्यांनी बंद केलंय. कॅालेजच्या गेटबाहेर विद्यार्थी बसले. इंर्टनशीपच्या काळातंही विद्यार्थ्यांकडून शिकवणी शुल्क वसूल केला जातो. एका विद्यार्थ्यांकडून 14 हजार रुपये आकारले जातात, त्याविरोधात आंदोलन सुरू आहे. शिक्षकांनाही आत जाऊ दिलं जात नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे कॅालेजची सेवा, रुग्णालय बंद पडलंय.

अंतिम वर्षाचे विद्यार्थी गेटसमोर

नागपुरातील विद्यार्थ्यांनी एक मोठं कॉलेज लॉक केलं आहे. विद्यार्थी गेटबाहेर बसल्यानं कॉलेजचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हे सगळे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत. इंटर्नशिपच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याकडून चौदा हजार रुपये शिकवणी शुल्क आकारण्यात आलं. त्याविरोधात हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. इंटर्नशिपच्या काळातील शिकवणी शुल्क रद्द करण्यात यावं, ही आमची मागणी आहे, असं विद्यार्थ्यांनी सांगितलं.

प्रशासन काय निर्णय घेणार?

शिक्षकांना मागील तीन वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. परंतु, फक्त आश्वासन दिलं जातं. प्रत्यक्ष विद्यापीठाकडून कृती होताना दिसत नाही. त्यामुळं हे आंदोलन केल्याचं विद्यार्थी सांगतात. या एकाच नाही, तर राज्यातील पाच महाविद्यालयांची ही मागणी आहे. जोपर्यंत इंटर्नशीप काळातील शिकवणी शुल्क रद्द होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा पावित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलाय. इंटर्नशिपच्या काळात हे विद्यार्थी शेतकऱ्यांपर्यंत जातात. परंतु, त्या काळातलेही शिकवणी शुल्क का घेतला जाते, असा या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं विद्यापीठ प्रशासन काय निर्णय घेतो आणि विद्यार्थी काय निर्णय घेतात, हे पाहावं लागेल.

NMC | नागपूर मनपात 67 लाखांचा स्टेशनरी घोटाळा!; सहा जणांना नोटीस, वित्त व लेखा अधिकाऱ्यांचा समावेश

Chandrapur Tiger | पोंभुर्णा भागात वाघाची दहशत; फिरायला जाणारी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Nagpur | नायलॉन मांजावरील बंदी : काय उपाययोजना केल्या?; उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें