Chandrapur Tiger | पोंभुर्णा भागात वाघाची दहशत; फिरायला जाणारी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

यवतमाळच्या वणीच्या कोलारपिंपरी परिसरात वाघिणीचा मुक्त संचार सुरू आहे. सकाळ पाळीत कामावर जाणाऱ्या वेकोली कामगारांना वाघाचे दर्शन घडले. वाघाच्या मुक्त संचाराने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

Chandrapur Tiger | पोंभुर्णा भागात वाघाची दहशत; फिरायला जाणारी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 10:48 AM

चंद्रपूर : सकाळी फिरायला जाणं महिलेला महागात पडलं. कारण दबा धरून बसलेल्या वाघानं या महिलेवर हल्ला चढवला. शेजारी तिच्या मदतीला धावले. पण, तोपर्यंत वाघानं महिलाचा घास घेतला होता. पोंभुर्णा भागात आज सकाळी ही घटना घडली. त्यामुळं या परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत.

अशी घडली घटना

वेळवा येथील संध्या विलास बावणे (वय 35) असं मृतक महिलेचं नाव आहे. संध्या सकाळी सहाच्या सुमारास पोंभुर्णा मार्गावर फिरायला गेल्या होत्या. डॉ. पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. सोबत फिरणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत वाघाने महिलेला ठार करून पोबारा केला. महिलेला दोन मुले आहेत. वनविभाग व पोलीस विभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली.

शेतात जाण्यास घाबरतात नागरिक

पोंभुर्णा भागात शेती आहे. पण, शेताशेजारी जंगल आहे. या जंगलातून वाघ केव्हा येईल. तो हल्ला केव्हा करेल, याची काही शास्वती नाही. त्यामुळं शेतात जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.

निवडणुकीच्या प्रचारात अडथळा

पोंभुर्णा नगरपंचायतची निवडणूक होत आहे. त्यासाठी प्रचार सुरू झाला आहे. पण, घराबाहेर पडताना कार्यकर्त्यांना विचार करावा लागतो. सकाळी-सकाळी हा वाघ हल्ला करू शकतो. तर मग रात्री-बेरात्रीचा प्रश्नच नाही. प्रचारातही अडथळे येत आहेत.

कोलारपिंपरी परिसरात वाघिणीचा मुक्त संचार

दुसरीकडं यवतमाळच्या वणीच्या कोलारपिंपरी परिसरात वाघिणीचा मुक्त संचार सुरू आहे. सकाळ पाळीत कामावर जाणाऱ्या वेकोली कामगारांना वाघाचे दर्शन घडले. वाघाच्या मुक्त संचाराने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. चंद्रपूरच्या ताडोबा आणि यवतमाळच्या टिपेश्वरमधून वाघाचे आवागमन होत असल्याची माहिती आहे. वाघाच्या मुक्त संचाराचा व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Nagpur | नायलॉन मांजावरील बंदी : काय उपाययोजना केल्या?; उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

Nagpur | गडचिरोली झाले कुल्लु-मनाली!; विदर्भात हुडहुडी वाढली, आता खऱ्या अर्थानं थंडीला सुरुवात

Nagpur | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; जाणून घ्या आज संविधानाची फलनिष्पत्ती माजी सनदी अधिकाऱ्यांकडून

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.