Nagpur | गडचिरोली झाले कुल्लु-मनाली!; विदर्भात हुडहुडी वाढली, आता खऱ्या अर्थानं थंडीला सुरुवात

नागपुरातही पारा 13.6 अंशांपर्यंत खाली आला. आणखी दोन दिवसांत पाऱ्यात घसरण होणार असल्यानं विदर्भवासींयांना थंडीपासून बचावासाठी उनीच्या कपड्यांचा (woolen clothes) वापर वाढवावा लागणार आहे.

Nagpur | गडचिरोली झाले कुल्लु-मनाली!; विदर्भात हुडहुडी वाढली, आता खऱ्या अर्थानं थंडीला सुरुवात
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 7:14 AM

नागपूर : विदर्भात (Vidarbha) जसा उन्हाचा पारा वाढतो. तशाच थंडीत पारा कमी होतो. यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीला (cold) सुरुवात झाली. पण, आता तिसऱ्या आठवड्यात खऱ्या अर्थानं थंडी पडू लागली. उनीचे कपडे बाहेर काढावे लागलेत. गडचिरोलीत (Gadchiroli) तर काल पारा 12.6 अंशांपर्यंत खाली गेला होता. त्यामुळं तिथं कुल्लू मनालीत राहत असल्याचा आनंद लुटता आला. नागपुरातही पारा 13.6 अंशांपर्यंत खाली आला. आणखी दोन दिवसांत पाऱ्यात घसरण होणार असल्यानं विदर्भवासींयांना थंडीपासून बचावासाठी उनीच्या कपड्यांचा (woolen clothes) वापर वाढवावा लागणार आहे.

उत्तरेकडील हवामानाचा विदर्भावर परिणाम

गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात घसरण झाली. बुधवारी सायंकाळपासून गारठा वाढायला लागलाय. विदर्भात 12.6 अंश तापमान गडचिरोलीचे होते. नागपूर शहराचे किमान तापमान 13.6 अंश नोंदविले गेले. जम्मू काश्मीर परिसरात वेस्टर्न डिस्टरबन्स व सायक्लोनिक सर्क्युलर तयार झालंय. हरियाणातही सायक्लोनिक सर्क्युलर तयार झालंय. उत्तरेकडील हवामानाचा विदर्भावर परिणाम जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून आकाश निरभ्र आहे. त्यामुळं थंडी वाढायला लागली आहे. विदर्भातील काही भागात किमान तापमानापेक्षा एक ते तीन अंशांची घट होणार आहे. दिवसातील तापमानातही घट होईल. गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात घसरण झाली आहे. बुधवारी सायंकाळी सहापासून थंडीचा जोर वाढायला लागला आहे. शिवाय दिवसाच्या तापमानातही घट झाली आहे.

पुढील आठवड्यात थंडी आणखी वाढणार

पुढील आठवड्यात थंडीचं प्रमाण आणखी वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दोन-तीन अंश डिग्री सेल्सिअस तापमानात घट होईल. पुढील आठवड्यात 10-11 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी तापमान होईल, असा अंदाज आहे. तर जास्तीत-जास्त तापमान 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आले. आकाश निरभ्र राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पडते तशी थंडी पडली नव्हती. पण, गेल्या दोन दिवसांत विदर्भातील तापमानात घसरण झाली. त्यामुळं खऱ्या अर्थानं थंडीला सुरुवात झाली म्हणता येईल. ढगाळ वातावरणानं तापमानात घसरण होत आहे. उबदार कपड्यांची गरज भासू लागली आहे.

School Reopen| स्कूल चले हम! एक ते सातच्या नागपूर मनपा शाळा आजपासून; काय असतील निर्बंध?

Yavatmal Pollution | वणीत प्रदूषणाचा धोका कायम; उपाययोजना करण्यासाठी भाजप नेते सरसावलेत

Nagpur | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; जाणून घ्या आज संविधानाची फलनिष्पत्ती माजी सनदी अधिकाऱ्यांकडून

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.