सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच अडचणीत, माजी मंत्री झाला आक्रमक, नोटीस बजावणार; काय आहे प्रकरण?

| Updated on: Aug 28, 2023 | 3:33 PM

माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. वकिलामार्फत ही नोटीस बजावण्यात येणार आहे.

सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच अडचणीत, माजी मंत्री झाला आक्रमक, नोटीस बजावणार; काय आहे प्रकरण?
सर्वाधिक वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा समावेश आहे. सचिनने भारतासाठी वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सिक्स मारले आहेत. 27 सिक्स मारत सचिन पहिल्या क्रमांकावर आहे.
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावती | 28 ऑगस्ट 2023 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रचंड अडचणीत येण्याची शक्यता आहे. सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं महागात पडणार आहे. सचिन तेंडुलकर यांना माजी मंत्री बच्चू कडू हे वकिलामार्फत नोटीस बजावणार आहेत. येत्या दोन दिवसात ही नोटीस बजावली जाणार आहे. स्वत: बच्चू कडू यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता सचिन तेंडुलकर या नोटिशीला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे.

ऑनलाईन गेमची जाहिरात करणं मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. सचिन यांनी ऑनलाईन गेमची जाहिरात केल्यामुळे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. ही जाहिरात केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांना 30 तारखेला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. तर भारतरत्नाने कुठली जाहिरात करावी आणि कुठली नाही याची आचारसंहिता आहे. त्यामुळे आता सचिन यांना वकिलामार्फत नोटीस पाठवल्या नंतर आंदोलनाची घोषणा करू अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

आक्षेप का?

सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. भारतरत्न असलेल्या व्यक्तीचा आदर्श तरुण पिढीसमोर असतो. अशावेळी या व्यक्तीने चुकीचं कृत्य केल्यास त्याचा समाजावर आणि तरुण पिढीवर परिणाम होऊ शकतो. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे जुगाराचं समर्थन केलं आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

माफी मागावी

सचिन तेंडुलकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सरकारने सचिन यांच्याशी बोलावं आणि त्यांना या जाहिरातीतून माघार घ्यायला लावावी असं बच्चू कडू यांना वाटतं. तसेच सचिन तेंडुलकर यांनी या जाहिरातप्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे.

आंदोलनाचा इशारा

दरम्यान, बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कधी आंदोलन करणार हे बच्चू कडू यांनी जाहीर केलं नाही. मात्र, लवकरच हे आंदोलन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.