AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भरतशेठची मिठी मला अफजल खानाची मिठी वाटते’, नितीन देशमुख आणि भरत गोगावले यांच्यात कलगीतुरा

शिवसेना आमदार भरत गोगावले आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आज विधान भवन परिसरात समोरासमोर आले. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिश्किल टोला लगावला. "भरत गोगावले यांची मिठी आपल्याला अफजल खानाची मिठी वाटते", असं नितीन देशमुख यावेळी मिश्किलपणे म्हणाले.

'भरतशेठची मिठी मला अफजल खानाची मिठी वाटते', नितीन देशमुख आणि भरत गोगावले यांच्यात कलगीतुरा
| Updated on: Dec 13, 2023 | 5:53 PM
Share

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, नागपूर | 13 डिसेंबर 2023 : विधी मंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील सर्व आमदार सध्या नागपुरात आहेत. अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदारांच्या गाठीभेटी देखील होत आहेत. विधान भवन परिसरात आज अशीच एक भट घडून आली. शिवसेना आमदार भरत गोगावले आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची आज योगायोगाने भेट घडून आली. विशेष म्हणजे दोन्ही एकाच वेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.

“भरतशेठची मिठी मला अफजल खानाची मिठी वाटते”, असं नितीन देशमुख यावेळी म्हणाले. त्यावर भरत गोगावले यांनीदेखील तसंच उत्तर दिलं. “देशमुख सोबत आले तर मिठी काय, खांद्यावर घेऊन नाचू”, असा मिश्किल टोला भरत गोगावले यांनी लगावला. “मी जास्त जाड आहे की देशमुख जास्त जाड आहे? माझं 72 किलो वजन आहे, देशमुखांचं 80 किलोपेक्षा जास्त वजन आहे. त्यांना जर भीती वाटत असेल, मी शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि तिथल्या भागाचा आहे. आमच्याकडून चुकीचं काही होणार नाही”, असंही गोगावले यावेळी म्हणाले.

नितीन देशमुख आणि भरत गोगावले यांच्यात सुरतवरून दोघांमध्ये रंगला कलगीतुरा

भरत गोगावले – नितीन देशमुखनं सुरतला टोकाचा निर्णय घेतला होता. पण मग ते मागे फिरले

भरत गोगावले – मी सुरतचा उल्लेख केला पण त्यात कुठेही छ्त्रपतींचा अपमान केलेला नाही. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. आम्ही असा कसा अपमान करू? आणि केला तर दहावेळा माफी मागू

नितीन देशमुख – महाराजांनी सुरत लुटली यांना सुरतेनं लुटले

भरत गोगावले – आम्हाला कोणीही लुटले नाही. आम्ही सत्तेत आल्यावर महाराष्ट्राचे भलं केलं, विकास केला.

नितीन देशमुख – काय विकास केला सांगा? मीठी मारणार नाही. कारण ती अफजल खानाची ठरेल

भरत गोगावले – मी काही अफजल खान नाही, त्याच्याच मतदार संघात शिवरायांचा साधा पुतळा नाही

नितीन देशमुख – हे भाजपच्या कमळावर लढतील

भरत गोगावले – काहीही बोलू नका. आम्ही शिवसेनेतूनच लढणार आहोत

भरत गोगावले – नितीन देशमुख माझा मित्र आहे म्हणून त्याला सुरतवरून परत आणण्यास मदत केली. त्याला विचारा, नितीनने शेवटचा टोकाचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी मी त्याला मदत केली.

नितीन देशमुख – शेतकऱ्यांना मदत मिळत नाही

भरत गोगावले – अरे मी यात मदत करेन

नितीन देशमुख – असे असेल तर मी मीठी मारतो

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.