AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते; संजय राऊत यांचा गोगावलेंवर हल्ला

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी काल विधानसभा अध्यक्षांसमोर साक्ष दिली. त्यांच्या या साक्षीवरून राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गोगावले यांनी थेट स्वत:ची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं विधान केलं आहे. शिवाजी महाराज सुरतला गेले होते, म्हणून मीही सुरतला गेलो होतो, असं धक्कादायक विधान भरत गोगावले यांनी केलं आहे. गोगावले यांच्या या विधानावर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते; संजय राऊत यांचा गोगावलेंवर हल्ला
bharat gogawaleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 13, 2023 | 11:47 AM
Share

मुंबई | 13 डिसेंबर 2023 : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. तिथलं वातावरण चांगलं आहे. त्यामुळे मीही सुरतला गेलो होतो, अशी साक्ष शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिली होती. विधानसभा अध्यक्षांसमोर काल गोगावले यांची साक्ष झाली. यावेळी वकील देवदत्त कामत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोगावले यांनी ही साक्ष दिली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गोगावले यांच्या या विधानावर टीका करण्यात येत आहे. विरोधकांनी गोगावले यांचं हे विधान शिवाजी महाराज यांचा अपमान करणारं असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या विधानावरून गोगावले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

भरत गोगावले यांचं हे विधान म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. ते ब्रिटिशांना ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी. तुम्ही महाराष्ट्र लुटायला तिकडे गेला. तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. शिवाजी महाराज गुवाहाटीला गेले नव्हते. शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते, अशी खवचट टीका संजय राऊत यांनी केली आहे.

गद्दारी आणि बंड यात फरक

गद्दारी आणि बंड यात फरक आहे. गद्दारी आणि बंड यात खूप फरक आहे. गद्दारांनी शिवाजी महाराजांशी स्वत:ची तुलना करू नये. जे खरे बंडखोर असतात ते देशासाठी आणि राज्यासाठी बंड करतात. त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं, असं राऊत म्हणाले.

आधी चीनला हटवा

पाकव्याप्त काश्मीर परत भारतात घेण्यासाठीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पंडित नेहरूंचा विषय काढू नका. ते महान नेते होते. लडाख कुणाच्या कार्यकाळात गेला? लडाखची जमीन कुणाच्या कार्यकाळात गेली? पाकव्याप्त काश्मीर परत भारतात आणण्याची 2014मध्ये तुम्ही गॅरंटी दिली होती. 56 इंचाची छाती दाखवली होती. कधी घेऊन येणार आहात? चीन घुसलाय त्यांना तर बाहेर हटवा, असा टोला त्यांनी लगावला.

यांनी कुणाचं नाक कापलं?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाजी महाराज वखारी लुटायला गेले होते. इंग्रजांच्या वखारी लुटायला गेले होते. यांनी कोणाच नाक कापलं. पन्नास खोक्यांसाठी पळून गेले नव्हते. हे तर गद्दारी करून गेले. शिवाजी महाराज यांची बरोबरी करणारे कोण गोगावले? शिवाजी महाराज यांच्या नखांची बरोबरी करू शकत नाही. हे तर खंडूजी खोपडे, गणोजी शिर्के ,आणि सूर्याजी पिसाळ आहेत, असा हल्ला अंबादास दानवे यांनी केला.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा