ICU मृत्यूपूर्वी आयसीयूमध्ये केलं पुस्तकाचं प्रकाशन, नागपुरातल्या दंदे रुग्णालयातील घटना, नाना पटोले यांची उपस्थिती

| Updated on: Nov 24, 2021 | 6:21 PM

मॉम यू आर ग्रेट या पुस्तकाचं प्रकाशन लेखिकेच्या मृत्यूपूर्वी आयसीयूमध्ये करण्यात आले. सुभाषिणी कुकडे असं या 74 वर्षीय लेखिकेचे नाव आहे. नागपूरच्या डॉक्टर दंदे रुग्णालयानं हा हृदय हेलावणारा प्रसंग अनुभवला.

ICU मृत्यूपूर्वी आयसीयूमध्ये केलं पुस्तकाचं प्रकाशन, नागपुरातल्या दंदे रुग्णालयातील घटना, नाना पटोले यांची उपस्थिती
Follow us on

नागपूर : गेली काही वर्षे परिश्रम घेऊन लिहिलेले पुस्तक मरणापूर्वी प्रकाशित व्हावे, अशी शेवटची इच्छा मरणासन्न अवस्थेतील एका लेखिकेची होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पुढाकाराने आयसीयूत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. काही तासांतच लेखिकेनं जगाचा निरोप घेतला.

विशेष म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन 19 नोव्हेंबरला रात्री साडेनऊ वाजता आयुसीयूमध्येच नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आलं. मॉम यू आर ग्रेट या पुस्तकाचं प्रकाशन लेखिकेच्या मृत्यूपूर्वी आयसीयूमध्ये करण्यात आले. सुभाषिणी कुकडे असं या 74 वर्षीय लेखिकेचे नाव आहे. नागपूरच्या डॉक्टर दंदे रुग्णालयानं हा हृदय हेलावणारा प्रसंग अनुभवला.

वार्धक्यामुळं आजाराशी झगडत होत्या

सुभाषिणी कुकडे यांनी काही वर्षांपूर्वी मॉम यू आर ग्रेट हा कथासंग्रह लिहिला होता. या पुस्तकात सुमारे 10 कथांचा संग्रह आहे. देशात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पुस्तकाचं प्रकाशन लांबणीवर पडत राहिलं. गेल्या काही महिन्यांपासून कुकडे यांचीही प्रकृती वार्ध्यक्यामुळे खालावली होती. त्या आजाराशी झगडत होत्या. प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांना दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

भावनिक क्षणानं सारेच भारावले

सुभाषिणी यांचे पती मधुकर कुकडे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पुस्तक प्रकाशनासाठी वेळ घेतली. रुग्ण गंभीर असताना पुस्तक प्रकाशन कसं करावं असा प्रश्न होता. परंतु कुकडे यांच्या जीवाची घालमेल पाहून आयसीयूतच प्रकाशन करण्याचा निर्णय डॉक्टर दंदे यांनी घेतला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता आयुसीयूमध्येच नाना पटोले यांच्या हस्ते मॉम यू आर ग्रेट या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी व डॉक्टर पिनाक दंदे उपस्थित होते. पुस्तकाचं प्रकाशन सुभाषिणी यांच्या बेडजवळच करण्यात आलं. मरणशय्येवर असतानाही सुभाषिणी यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होतं. सुभाषिणी कुकडे यांचं हे सहावं पुस्तक होतं. पुस्तक प्रकाशन झाल्यावर काही तासानंतर पहाटे अडीचच्या सुमारास सुभाषिणी कुकडे यांची प्राणज्योत मालवली. या भावनिक क्षणामुळे सर्वच भारावले.

विदर्भातील धान खरेदीबाबत मंत्री भुजबळांनी घेतली बैठक; बारदाना खरेदीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

दुर्गापूरच्या ग्रामपंचायतीमध्ये राडा, गावकऱ्यांनी दारू दुकानाला परवानगी नाकारली