नागपुरात नगरसेवकांचा ऑनलाईन प्रचार, मतदारांच्या घायाळ करणाऱ्या प्रश्नांनी लोकप्रतिनिधी निरुत्तर! 

| Updated on: Jul 29, 2021 | 2:43 PM

मतदारांच्या प्रश्नांवर नेतेमंडळींची गोची होत असल्याचा निष्कर्ष गेल्या काही दिवसांत सोशल माध्यमातील हायटेक प्रचारातून लक्षात येतोय, असं तज्ज्ञ सांगतात.

नागपुरात नगरसेवकांचा ऑनलाईन प्रचार, मतदारांच्या घायाळ करणाऱ्या प्रश्नांनी लोकप्रतिनिधी निरुत्तर! 
नागपूर महापालिका
Follow us on

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीला सहा महिने वेळ आहे, पण तरीही कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीत मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी विविध पक्षांच्या नगरसेवकांनी सोशल मिडियाद्वारे हायटेक प्रचार सुरु केलाय. पण सोशल मिडियाच्या मदतीनं नगरसेवकांनी प्रचार सुरु केल्यानंतर, त्यांना नव्या डोकेदुखीचा सामना करावा लागतोय. मतदारांच्या प्रश्नांनी नेते मंडळी निरुत्तर होतायत.

कोरोनात आम्हाला बेड मिळत नव्हता, तेव्हा कुठे होता?

“निवडणुकीच्या आधी उगवले का?”, आम्हाला कोरोनात बेड मिळत नव्हता, तेव्हा तोंड का दाखवलं नाही, इथपासून तर कोरोना काळात तुम्ही केलेलं काम सांहा, अनेक प्रश्नांचा भडीमार मतदार काही निष्क्रिय नगरसेवकांवर करत आहेत. त्यामुळे हायटेक प्रचारादरम्यान मतदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना नगरसेवकांची भंभेरी उडतेय.

मतदारांच्या प्रश्नांवर नेतेमंडळींची गोची

मतदारांच्या प्रश्नांवर नेतेमंडळींची गोची होत असल्याचा निष्कर्ष गेल्या काही दिवसांत सोशल माध्यमातील हायटेक प्रचारातून लक्षात येतोय, असं तज्ज्ञ सांगतात. तर लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी, जे नगरसेवक सक्रिय नाहीत, त्यांना ही जास्त डोकेदुखी आहे. ही बाब महानगरपालिकेतील भाजपचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी मान्य केलीय.

नेतेमंडळींची भंभेरी उडतीय

महानगरपालिका निवडणूकीला सहा महिने बाकी आहे, पण तरिही कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीत मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांच्या नगरसेवकांनी सोशल मिडियाद्वारे हायटेक पण एकतर्फी प्रचार सुरु केला आहे. महत्वाची बाब म्हणजे गेले अनेक दिवस गायब असलेले नगरसेवक आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उद्घाटन, लोकार्पण सोहळ्यातून पाहायला मिळत आहेत.

पण सोशल मिडियाच्या मदतीनं नगरसेवकांनी प्रचार सुरु केल्यानंतर, त्यांना नव्या डोकेदुखीचा सामना करावा लागतो आहे. सोशल माध्यमावर मतदारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याच प्लॅटफॉर्मवर उत्तरं देताना नगरसेवकांची भंभेरी उडत असल्याचा कटू अनुभव सध्या नागपुरातील अनेक नगरसेवकांना येत आहे.

मतदारांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या, सोशल मिडिया तज्ज्ञांचं नेत्यांना मार्गदर्शन

“सोशल माध्यमावरील हायटेक प्रचार करताना, त्यावर मतदारांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली नाही, तर त्याचा विपरीत परिणाम संबंधीत नगरसेवकाला होऊ शकतो, त्यामुळे सोशल मिडिया निवडणूकीतलं एक दुधारी हत्यार म्हणून त्याकडे बघणं गरजेचं आहे, त्यामुळे सोशल मिडियावर विचारलेल्या प्रश्नांची तिथेच उत्तर देणं गरजेचं आहे , पोस्ट्स ह्या एकतर्फी नकोच ” असं मत सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले आहे.

(Carporator Campaigning on Social Media nagpur Municipal Carporation 2021)

हे ही वाचा :

नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन, पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंची कारवाई

नाना पटोले फडणवीसांच्या विरोधात नागपूर दक्षिण-पश्चिममधून शड्डू ठोकणार? आढावा बैठकीत पटोलेंचं मोठं विधान