नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांची डोकेदुखी वाढली! सोशल माध्यमावरील प्रश्नांमुळे नगरसेवकांची भंभेरी

सोशल मिडियाच्या मदतीनं नगरसेवकांनी प्रचार सुरु केल्यानंतर, त्यांना नव्या डोकेदुखीचा सामना करावा लागतो आहे. सोशल माध्यमावर मतदारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याच प्लॅटफॉर्मवर उत्तरं देताना नगरसेवकांची भंभेरी उडत असल्याचा कटू अनुभव सध्या नागपुरातील अनेक नगरसेवकांना येत आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांची डोकेदुखी वाढली! सोशल माध्यमावरील प्रश्नांमुळे नगरसेवकांची भंभेरी
सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे, नागपूर महापालिका

नागपूर : महानगरपालिका निवडणूकीला सहा महिने बाकी आहे, पण तरिही कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीत मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांच्या नगरसेवकांनी सोशल मिडियाद्वारे हायटेक पण एकतर्फी प्रचार सुरु केला आहे. महत्वाची बाब म्हणजे गेले अनेक दिवस गायब असलेले नगरसेवक आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उद्घाटन, लोकार्पण सोहळ्यातून पाहायला मिळत आहेत. पण सोशल मिडियाच्या मदतीनं नगरसेवकांनी प्रचार सुरु केल्यानंतर, त्यांना नव्या डोकेदुखीचा सामना करावा लागतो आहे. सोशल माध्यमावर मतदारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याच प्लॅटफॉर्मवर उत्तरं देताना नगरसेवकांची भंभेरी उडत असल्याचा कटू अनुभव सध्या नागपुरातील अनेक नगरसेवकांना येत आहे. (Nagpur Municipal Election, campaigning on social media is a headache for corporators)

नागरिकांच्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची आणि या नव्या डोकेदुखीला सामोरं कसं जायचं, यासाठी नगरसेवक आता तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याची बाब, निदर्शनास आली आहे. “सोशल माध्यमावरील हायटेक प्रचार करताना, त्यावर मतदारांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली नाही, तर त्याचा विपरीत परिणाम संबंधीत नगरसेवकाला होऊ शकतो, त्यामुळे सोशल मिडिया निवडणूकीतलं एक दुधारी हत्यार म्हणून त्याकडे बघणं गरजेचं आहे, त्यामुळे सोशल मिडियावर विचारलेल्या प्रश्नांची तिथेच उत्तर देणं गरजेचं आहे , पोस्ट्स ह्या एकतर्फी नकोच ” असं मत सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले आहे.

सोशल माध्यमावरील हायटेक पण दिशाहीन प्रचार नगरसेवकांसाठी डोकेदुखी

नागपूर महानगरपालीकेत सध्या भाजपचे 108, काँग्रेसचे 29, बसपाचे 10, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि अपक्ष 1 असं संख्याबळ आहे. 151 पैकी सर्वाधिक जागा भाजपकडे आहे. पण 15 वर्षांच्या सत्तेमुळे भाजपसाठी ही निवडणूक नक्कीत सोपी नाही. शिवाय काँग्रेसनेही यावेळेस जोर लावलाय. त्यामुळे सहा महिन्याआधीपासूनंच सोशल माध्यमावर निवडणूकीच्या प्रचाराची रंगीत तालिम सुरु झाली आहे. पण उलट प्रश्नांमुळे विद्यमान नगरसेवकांची डोकेदुखी वाढली आहे. “निवडणूकीच्या आधी उगवले का? आम्हाला कोरोनात बेड मिळत नव्हता, तेव्हा तोंड दाखवलं नाही, इथपासून तर लायकी काढण्यापर्यंत, अनेक प्रश्नांचा भडिमार लोक आप आपल्या नगरसेवकांना सध्या सोशल मिडियावर विचारत आहे. त्यामुळे सोशल मिडियावर फक्त भुमिपूजन किंवा चमकोगीरीचे फोटो टाकण्यात धन्यता मानणाऱ्या नगरसेवकांना, या प्रश्नांची काय आणि कशी उत्तरं द्यायची? हे सुचत नसल्याने सध्या सोशल माध्यमावरील हायटेक पण दिशाहीन प्रचार नगरसेवकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत” अशी बाब अजित पारसे यांच्या सामाजिक माध्यमांवरील प्रचाराच्या अभ्यासातून लक्षात आल्याचं त्यांनी सांगीतलं आहे.

नागरिकांचे प्रश्न आणि नगरसेवकांची तारांबळ!

इंटरनेटच्या या युगात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची मोठी संख्या आहे. एका आकडेवारीनुसार नागपूर शहरातील एकूण मतदारांपैकी जवळपास 40 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार सोशल मिडियाचा वापर करतात. कोरोना आणि लॉकडाऊन या काळात लोकांनी बराच वेळ घरातंच घालवला, त्यामुळे सोशल माध्यमाबाबत लोकांची जागरुकताही वाढली आहे. त्यामुळेच निवडणूकीपूर्वी आता आपले नगरसेवक सोशल माध्यमावर प्रचार करताना दिसले, की नाराज असलेले मतदार त्यांच्यावर तुटून पडतात. पुढील काळात नगरसेवकांसमोरची ही डोकेदुखी अधिक वाढणार आहे. त्यामुळे हायटेक प्रचार करायचा असेल, तर या डोकेदुखीवर अनुभवी, अर्थपूर्ण समाधान शोधणं हाच नगरसेवकांसमोर पर्याय आहे.

संबंधित बातम्या :

नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन, पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंची कारवाई

नाना पटोले फडणवीसांच्या विरोधात नागपूर दक्षिण-पश्चिममधून शड्डू ठोकणार? आढावा बैठकीत पटोलेंचं मोठं विधान

Nagpur Municipal Election, campaigning on social media is a headache for corporators

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI