BIG BREAKING | काँग्रेसच्या गोटातून सर्वात मोठी बातमी, ‘या’ बड्या नेत्याला दाखवला थेट पक्षाबाहेरचा रस्ता, थेट हायकमांडकडून निलंबन

काँग्रेसच्या गोटातून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. काँग्रेस हायकमांडने पक्षातील एका बड्या नेत्यावर कारवाई केली आहे. खरंतर काँग्रेस अशाप्रकारची कारवाई करणार असल्याचं वृत्त 'टीव्ही 9 मराठी'ने दोन दिवसांपूर्वीच दिली होती. आज त्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय.

BIG BREAKING | काँग्रेसच्या गोटातून सर्वात मोठी बातमी, या बड्या नेत्याला दाखवला थेट पक्षाबाहेरचा रस्ता, थेट हायकमांडकडून निलंबन
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 07, 2023 | 6:34 PM

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांची रणनीती सुरु आहे. असं असताना काँग्रेसच्या (Congress) गोटातून मोठी बातमी आली आहे. काँग्रेसने नागपुरातील एका बड्या नेत्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेस हायकमांडने या नेत्याला थेट पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेस पक्षाने याआधी आमदार सत्यजित तांबे आणि त्यांच्या वडिलांवर निलंबनाची कारवाई राज्यात केलेली. त्यानंतर आता आणखी बड्यानेत्यावर कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षाच्या हायकमांडकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने आशिष देशमुख यांना थेट पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आलं आहे. आशिष देशमुख यांनी नुकतंच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केलेली. देशमुखांनी टीका केल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आशिष देशमुख यांच्यावर कारवाईची शक्यता होणार असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर आहेत. ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ने दोन दिवसांपूर्वी दिलं आहे. त्यामुळे याबाबत टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तावर काही अंशी शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र दिसत आहे.

आशिष देशमुख हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याती माहिती विश्वसणीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिलीय. विशेष म्हणजे या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आशिष देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर ते हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर नेमकी काय टीका केलेली?

“16 तारखेला नागपुरात वज्रमुठ सभा असताना, 20 ते 25 तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा म्हणजे वज्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस महाविकास आघाडीपासून वेगळी चूल मांडण्यासाठी राहूल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा घेत आहे. महाविकास आघाडीतून वेगळी चूल मांडण्यासाठी काँग्रेस वेगळी सभा घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी खोके जबाबदार आहे”, अशा शब्दांत आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता.

“मी काँग्रेस पक्षाचं हित व्हावं असंच वक्तव्य केलंय. त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्याचं काही कारण नाही. आमदारकीला एक वर्ष बाकी असताना मी काँग्रेसमध्ये आलोय. मला कारवाईची नोटीस मिळाली नाही. शिस्तपालन समितीला तीन तास बैठक घेतली. तरीही त्यांना माझ्या विरोधात एक कारण मिळालं नाही”, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली होती.