‘आमचं सरकार आलं तर…’, नागपूरच्या रॅलीतून राहुल गांधी यांचं मोठं आश्वासन

काँग्रेसची नागपुरात आज भव्य सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी संबोधित केलं. या सभेत राहुल गांधी यांनी देशातील जनतेला महत्त्वाचं आश्वासन दिलं. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमेकिच्या अगदी विरोधी भूमिकेचं आश्वासन दिलं आहे.

'आमचं सरकार आलं तर...', नागपूरच्या रॅलीतून राहुल गांधी यांचं मोठं आश्वासन
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 6:22 PM

नागपूर | 28 डिसेंबर 2023 : राज्यात आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा समाज आरक्षणसाठी आक्रमक झालाय. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी केलीय. तर त्यावरुन ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजाचं हक्काचं आरक्षणात कुणाला वाटा देऊ नये, अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. तर धनगर समाजाची देखील आरक्षणाबाबत महत्त्वाची मागणी आहे. देशात धनखड समाज म्हणून जो उल्लेख आहे त्याचा अर्थ धनगर असा होतो. त्यामुळे धनगर समाजालाही त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये आरक्षणाबाबत मागण्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी जातीय जनगणेनीची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार पडलेल्या बौद्धिक शिबिरात संघाचे विदर्भ सरसंघचालक श्रीधर घाडगे यांनी भूमिका जाहीर केली होती. यावेळी त्यांनी जातीय जनगणनेची गरज नाही, असं म्हटलं. पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात येऊन याबाबत मोठी घोषणा केलीय.

काँग्रेस पक्षाचा आज 139 वा वर्धापन दिवस आहे. या दिनाच्या निमित्ताने नागपुरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राहुल गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी जातीय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट केली. आमचं सरकार आलं तर सर्वात आधी देशात जातगणना केली जाईल, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.

‘जातीय जनगणना झाली पाहिजे’

“मी संसदेत भाजपच्या लोकांना विचारलं, हिंदुस्तानला 90 टक्के लोकं चालवतात. IAS अधिकारी आहेत. मी विचारलं, यापैकी ओबीसी, दलित, आदिवासी किती आहेत? भाजपचे लोक गप्प झाले. ओबीसींची कमीत कमी २० टक्के लोकसंख्या आहे, दलित १५ टक्के, आदिवासींची १२ टक्के लोकसंख्या आहे. ९० पैकी ३ अधिकारी ओबीसी समाजाचे आहेत. त्यांना कोपऱ्यात बसवतात, छोटे-छोटे विभाग देतात. भारतातील मोठ्या कंपन्या काढा आणि त्यात ओबीसी, दलित, आदिवासी समाजाचं कोण आहे ते दाखवून द्या. प्रत्येक क्षेत्रात हीच अवस्था आहे. त्यामुळे जातीय जनगणना झाली पाहिजे”, अशी स्पष्ट भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

राहुल गांधींचं मोठं आश्वासन

“मी मागणी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बोल बदलले. भारतात एकच जात आहे ती म्हणजे गरीब. एकच जात आहे तर तुम्ही ओबीसी कसे आहात? आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा जातीय जनगणना करुन दाखवू”, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं. “ही विचारधारेची लढाई आहे. कोट्यवधी लोकांना भाजप सरकारने गरिबीत ढकललं आहे. जे काम आम्ही मनरेगाच्या मदतीने केलं ते या लोकांनी सर्व संपवून टाकलं. आम्हाला दोन हिंदुस्तान नकोय, एक हिंदुस्तान अरबपतींचा, खोट्या स्वप्नांचा असेल, त्यात काही तथ्य नाही. देशाचे जवान सोशल मीडियाने जगू शकत नाही. त्यांना रोजगार हवा आहे. हे काम फक्त इंडिया आघाडी करु शकते. कारण या कामासाठी देशाचा आवाज ऐकावा लागेल”, असं राहुल गांधी म्हणाले.

‘संपूर्ण देशात निवडणूक जिंकू’

“द्वेष दूर करावा लागेल. देशाला जोडून पुढे जावं लागेल. आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर चाललो, चार हजार किमी चाललो. द्वेषाच्या बाजारात तुम्ही प्रेमाचं दुकान खोलू इच्छूक असाल तर तुम्ही काँग्रेसी आहात. मी महाराष्ट्राच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, कारण तुम्ही स्पेशल आहात, मी भारत जोडो यात्रेच महाराष्ट्रात आलो तेव्हा मी विचार केला ही काँग्रेसची जमीन आहे. इथे लोकांना न समजवता विचारधारा समजते. त्यामुळे आम्ही आज महाराष्ट्रात आलो आहोत. तुम्ही गब्बर शेर आहात. तुम्हाला कुणालाच घाबरायचं कारण नाही. तुमची विचारधारेची, मनाची लढाई आहे. तुम्ही आणि आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात निवडणूक जिंकणार आहोत”, असा दावा राहुल गांधींनी केला.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.