मला काँग्रेसमधून काढण्याचे षडयंत्र, आशिष देशमुख यांचे स्पष्टीकरण, पुढील रणनीती काय?

| Updated on: Apr 08, 2023 | 11:25 AM

मी काँग्रेस पक्षात आहे. मला पूर्ण खात्री आहे. शिस्तपालन समितीला पटेल. त्यानंतर ते मला पक्षातून काढण्याची कारवाई करणार नाहीत.

मला काँग्रेसमधून काढण्याचे षडयंत्र, आशिष देशमुख यांचे स्पष्टीकरण, पुढील रणनीती काय?
Follow us on

नागपूर : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांना पक्षाविरोधात बोलणं भोवलं आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं त्यांना तीन दिवसांत कारणे दाखवा नोटिसीचं उत्तर देण्यास सांगण्यात आलं. तोपर्यंत देशमुख यांना निलंबित करण्यात आलं. यावर बोलताना आशिष देशमुख म्हणाले, पक्षाच्या हिताच्या गोष्टी करत होता. तरी मला नोटीस दिली. हे चुकीचं आहे. पण, पक्षाच्या शिस्तपालन समितीनं मला दिलं आहे. त्याचं उत्तर वेळेआधी मी शिस्तपालन समितीला पाठवेन. दुसऱ्या कारणाचे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. खोके, सूरत, गुवाहाटी आणि संभाजीनगरमध्ये प्रांत अध्यक्षांची गैरहजेरी आणि १६ तारखेला नागपूरला होऊ घातलेल्या वद्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा आरोप लावण्यात आलाय.

नागपुरात वज्रमूठ सभेनंतर राहुल गांधी यांची दुसरी सभा लगेच घेण्यात येत आहे. पक्षाचे हे षडयंत्र सुरू आहे. या षडयंत्राची सुरुवात विधानसभेचे अध्यक्ष असताना तडकाफडकी राजीनामा दिला तेव्हापासून सुरू झालं. त्यासंदर्भात उत्तरात स्पष्टीकरण करेन. नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद सोडलं. ते संशयास्पद होतं. त्याचं उत्तर मी देईन, असंही आशिष देशमुख म्हणाले.

हे सुद्धा वाचा

इतर पक्षात जाण्याचा प्रश्न नाही

मी काँग्रेस पक्षात आहे. मला पूर्ण खात्री आहे. शिस्तपालन समितीला पटेल. त्यानंतर ते मला पक्षातून काढण्याची कारवाई करणार नाहीत. त्यामुळे इतरत्र कोणत्याही पक्षाकडे जाण्याचा प्रश्न आता उद्भवत नाही. शुक्रवार, शनिवार, रविवार असा लाँग विक एंड आला. त्यामुळे मुंबई ते नागपूर विमानाच्या किमती वाढल्या होत्या. यामुळे मी पुण्याच्या मार्गाने नागपूरला पोहचल्याचं आशिष देशमुख यांनी सांगितलं.

शरद पवार हे मागच्या आठवड्यात माझ्या शेतात येऊन गेले. त्यानिमित्त त्यांनी माझ्या शेतातील उसाची लागवड पाहिली, अशी माहितीही आशिष देशमुख यांनी दिली. आशिष देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यावर देशमुख यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. सध्यतरी मी काँग्रेस पक्षात आहे. वेळेत शिस्तपालन समितीला उत्तर देईन. त्या उत्तरावर ते समाधानी होतील. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं देशमुख म्हणाले.