सावरकरांच्या मुद्यांवर मतभिन्नता असू शकते, शरद पवार असं का म्हणालेत?

२० हजार कोटींची माझ्याकडे आकडेवारी नाही. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या २० हजार कोटींच्या आरोपावर दिली.

सावरकरांच्या मुद्यांवर मतभिन्नता असू शकते, शरद पवार असं का म्हणालेत?
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 10:42 AM

मुंबई : काही प्रश्नावर मतभेद असू शकतो. सावरकरांच्या मुद्दयांवर आमची चर्चा झाली आणि त्यातून आम्ही मार्ग काढला. चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. सावरकरांच्या मुद्यांवर मतभिन्नता असू शकते. असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. देशासमोर बेरोजगारी, महागाई यासारखे महत्त्वाचे विषय आहेत, असंही ते म्हणाले.

19 विरोधी पक्ष एकत्र आलेत. पण, त्यांना जेपीसीत स्थान मिळणार नाही. जेपीसी म्हणजे ज्यॉइंट पार्लमेंट्री कमिटी. या कमिटीत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे लोकं राहतात. विरोधी पक्षाला फार कमी महत्त्व दिलं जातं.

हे सुद्धा वाचा

मी जेपीसीऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक योग्य असल्याचं सांगितलं. मी जेपीसीला विरोध करत नाही. काही जेपीसींचा मीसुद्धा चेअरमन होतो. पण, जेपीसीत बहुमताच्या मुद्यावर पारदर्शकता निर्माण होईल, याची शास्वती नाही, असंही पवार म्हणाले.

उत्पादकाला चांगली किंमत द्या

देशात दुग्धजन्य पदार्थांची कमतरता होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आम्ही आयात करायचा विचार करू. असं सचिव म्हणाले. माझ त्यात एकच म्हणण आहे. आयात करण्याची गरज नाही. उत्पादक शेतकऱ्याला चांगली किंमत द्या. उत्पादन या देशाचा शेतकरी करेल.

नॉट रिचेबल म्हणजे काय?

अजित पवार नॉट रिचेबल असल्याचं पत्रकारांनी विचारलं. यावेळी मला माहीत नसल्याचं शरद पवार म्हणाले. नॉट रिचेबल म्हणजे काय, असंही पवार म्हणाले.

ती आकडेवारी माझ्याकडे नाही

२० हजार कोटींची माझ्याकडे आकडेवारी नाही. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या २० हजार कोटींच्या आरोपावर दिली.२०२४ ला  मोदी यांना हटवण्याच असेल तर विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. या विषयावर आमची बैठक झाली आहे. बैठकीत आम्ही आपलं म्हणण मांडलं.

सावरकर यांच्या मुद्यांवरून वाद सुरू आहे. भाजपने गौरव यात्रा काढली. राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने हा निर्णय घेतला. सावरकर यांच्या बाबत मतभिन्नता असू शकते, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.