Nagpur Corona चिंतेत भर, 13 पॉझिटिव्ह-53 सक्रिय, तीन आठवड्यांतील उच्चांक

| Updated on: Dec 03, 2021 | 10:36 AM

गुरुवारला शहरात 2447 व ग्रामीणमध्ये 791 अशा जिल्ह्यात 3238 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी 13 जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यापूर्वी जिल्ह्यात 10 नोव्हेंबर रोजी 11 बाधितांची नोंद करण्यात आली होती.

Nagpur Corona चिंतेत भर, 13 पॉझिटिव्ह-53 सक्रिय, तीन आठवड्यांतील उच्चांक
कोरोना विषाणू.
Follow us on

नागपूर : नागपूरकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गेल्या तीन आठवड्यांनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं एकूण सक्रिय असणाऱ्यांची संख्या 53 झाली आहे. काल दिवसभरात फक्त सहा जण बरे होऊन घरी परतले.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या 4,93,634 इतकी झाली. त्यापैकी 10,122 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर 4,83,459 रुग्ण बरे झालेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.94 टक्के आहे.

जिल्ह्यात 3238 चाचण्या

गुरुवारला शहरात 2447 व ग्रामीणमध्ये 791 अशा जिल्ह्यात 3238 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी 13 जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यापूर्वी जिल्ह्यात 10 नोव्हेंबर रोजी 11 बाधितांची नोंद करण्यात आली होती. शहरातील नऊ तर, ग्रामीणमधील दोन रुग्ण होते. त्यानंतर आजवर रुग्णसंख्येची एक अंकीमध्येच नोंद होत होती. परंतु गुरुवारला अचानक रुग्णसंख्या वाढल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे.

सक्रिय रुग्णसंख्या पन्नासच्या वर

दिवसभरात शहरातून 4 व जिल्ह्याबाहेरील 2 असे 6 जण ठणठणीत होऊन घरी परतलेत. सध्यास्थितीत रुग्णसंख्येत वाढ झाल्याने सक्रिय रुग्णांचीही संख्या पन्नासवर पोहचली आहे. आता शहरात 42 व ग्रामीणमध्ये 11 असे 53 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3,238 चाचण्या झाल्यात. यात शहरात 2,447 तपासण्यांमधून 8 तर ग्रामीणमध्ये झालेल्या 791 चाचण्यांमधून 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. दिवसभरात 6 जण ठणठणीत होऊन घरी परतले. एकाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.

रखडलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना

ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. त्यानुसार सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. गुरुवारला खुद्द विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील मेयो, मेडिकल व एम्स येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची पाहणी केली. त्यांचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. अचानक रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे.

Nagpur Administration भीती ओमिक्रॉनची, प्रशासन लागले कामाला, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरू करण्याच्या सूचना

Nagpur education फिरत्या बसमधून संगणक शिक्षण, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना लागणार गोडी