येत्या 5 महिन्यात लहान मुलांचं लसीकरण, कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होण्याची शक्यता!

| Updated on: Jul 15, 2021 | 9:37 AM

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच महिन्यात लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध कोण्याची शक्यता आहे.

येत्या 5 महिन्यात लहान मुलांचं लसीकरण, कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होण्याची शक्यता!
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच महिन्यात लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध कोण्याची शक्यता आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी अतिधोकादायक लाट पाहता आणि लहान मुलांसाठी असलेला धोका लक्षात घेता लहान मुलांचं लसीकरण लवकरात लवकर होणं गरजेचं आहे.

नागपुरात 12 ते 18 वर्षांच्या 50 मुलांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस

सध्या लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरु असून, नागपुरात 12 ते 18 वर्षांच्या 50 मुलांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आलाय. दुसरा डोस देण्यापूर्वी मुलांचे सॅम्पल्स गोळा केले असून, ॲंटिबॅाडीजचे सकारात्मक रिपोर्ट येतील, अशी आशा डॉ. वसंत खळतकर यांनी व्यक्त केलीय.

लहान मुलांना लसीची एमरजन्सी परवानगी मिळण्याची शक्यता

“नागपूरात आतापर्यंत 12 ते 18 वयोगटातील 50 मुलांना कोरोना लस दिली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहेत, पहिल्या टप्प्यातील अभ्यासानंतर लहान मुलांना लसीची एमरजंसी परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज लहान मुलांवर लसीची चाचणी करणारे डॉ. वसंत खळतकर यांनी वर्तवला आहे. शिवाय येत्या पाच महिन्यात लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध कोण्याची शक्यता आहे”, असंही के म्हणाले.

लहान मुलांच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात, डॉ. बकुळ पारेखांना विश्वास

दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाला (Vaccination) सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी व्यक्त केला आहे.

खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशन आयोजित ‘इन्फोडोस’ या डिजिटल जनजागृती अभियानात ते बोलत होते. डॉ. पारेख यांच्या या विधानाने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘इन्फोडोस’ या जनजागृती अभियानाच्या दुसऱ्या सत्रात ‘कोरोनाकाळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी’ या विषयावर डॉ. बकुळ पारेख यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधला.

“आत्तापर्यंत आपण 18 वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण करत आहोत. मात्र तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होऊ शकणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जगभरात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी चाचण्या सुरू आहेत. अमेरिकेत फायझर कंपनीने 12 वर्षांवरील मुलांवर कोरोना लसीकरणाच्या चाचण्यांना सुरुवात केली आहे. भारतात देखील, बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या बालकांवर सुरू आहेत. या चाचण्यांचा सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लहान मुलांचे कोरोना लसीकरण लवकरात लवकर करण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरु आहे”, असं ते म्हणाले.

(Corona Vaccnation For Child May be Start nor Next 5 month Says Dr Vasant khaltalkar)

हे ही वाचा :

लहान मुलांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लस मिळणार?