महाराष्ट्र सरकारने एका रात्रीत 8500 कोंबड्या आणि 16 हजार अंडी नष्ट का केली, मोठं कारण समोर

राज्य सरकारने एका रात्रीत निर्णय घेत नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र पोल्ट्री फार्ममधील तब्बल 8501कोंबड्यांची कलिंग म्हणजेच त्यांना मारण्याचा आणि 16 हजार अंडी नष्ट करण्याचा निर्णय घेतला. नेमकं काय कारण जाणून घ्या.

महाराष्ट्र सरकारने एका रात्रीत 8500 कोंबड्या आणि 16 हजार अंडी नष्ट का केली, मोठं कारण समोर
| Updated on: Mar 06, 2024 | 6:16 PM

नागपूर | राज्य सरकारच्या नागपूरमधील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र मधील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या काही दिवसांपासून शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. काही दिवसातच पोल्ट्री फार्ममधील तब्बल 2650 कोंबड्या दगावल्या. कोंबड्यांचा मृत्यूचा हा आकडा हा धडकी भरवणारा होता. त्यामुळे अचानक इतक्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे यासाठी पशु संवर्धन अधिकारी आले आणि त्यांनी पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोल्ट्री फार्ममधील उर्वरित कोंबड्या आणि त्यांची अंडी नष्ट करण्यात आली. नेमकं काय कारण जाणून घ्या.

पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू का झाला हे तपासण्यासाठी पुणे आणि भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. अहवाल समोर आल्यावर नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं.

अहवालात नेमकं काय समोर आलं?

नमुने पाठवण्यात आले होते त्याचा चार मार्चला अहवाल आला. या अहवालामध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लू ची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर अहवाल आला त्या दिवशीच पार मार्चला रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममधील 8501 कोंबड्यांची कलिंग म्हणजेच कोंबड्या मारण्याची प्रक्रिया करण्यात आली. फक्त कोंबड्याच नाहीतर अंडी उबवणी केंद्र असल्याने 16हजार पेक्षा जास्त अंडीहीसुद्धा नष्ट करण्यात आली. याबाबत नागपूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडकील यांनी माहिती दिली.

दरम्यान, पोल्ट्री फार्ममधील इतर पक्षीही बाधित असणार त्यासोबतच जी काही अंडी होतीत तीसुद्धा बाधित पक्षांची असल्यामुळे अहवाल आल्यावर रात्रीतच कलिंग आणि अंडी नष्ट करण्याचा निर्णय घेतला गेला.