AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Police | मालकाच्या नावाचा बनावट मेल; पैसे तिसऱ्याला पाठवायला सांगितले, फेक अकाउंट निघाल्याने अडचण

बनावट इ मेलच्या आधारे पैसे मागवून फसवणूक करण्यात आली. सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तांत्रिक स्वरुपाचा होता.

Nagpur Police | मालकाच्या नावाचा बनावट मेल; पैसे तिसऱ्याला पाठवायला सांगितले, फेक अकाउंट निघाल्याने अडचण
सायबर पोलीस स्थानक
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 12, 2022 | 6:45 PM
Share

नागपूर : नागपुरातील कंपनीचे काम करत असताना दिल्लीतील मालकाच्या (Delhi Owner) नावाने एक इ मेल आला. त्या मेलमधून चार लाख ऐंशी हजार रुपये तिसऱ्या व्यक्तीला द्या, मेसेज होता. मालकाच्या नावाचा मेल असल्यानं कर्मचाऱ्यांनी लगेच रक्कम वळती केली. मेलमध्ये दिलेल्या अकाउंटवर रक्कम वळती करण्यात आली. पण, ज्या मेलवरून माहिती देण्यात आली होती तो मेल आयडी फेक (ID Fake) असल्याचे लक्षात आले. बनावट इ मेलच्या आधारे पैसे मागवून फसवणूक करण्यात आली. सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तांत्रिक स्वरुपाचा होता. त्यामुळं सायबर पोलीस ( Cyber ​​Police ) ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.

दिल्लीला जाऊन आरोपींना आणले

हा तपास करताना असताना या गुन्ह्यामध्ये ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले होते. त्या अकाउंटची आणि त्याच्याशी संबंधित मोबाईल नंबर आणि इतर तांत्रीक बाबी तपासण्यात आल्या. सायबर पोलीस ठाण्यातील पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले. ते आरोपी दिल्ली येथील असल्याचे निदर्शनात आले. एपीआय रामकृष्ण पाटील, पोलीस अंमलदार अजय, पोलीस अंमलदार ठाकूर हे दिल्ली येथे गेले. त्यांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं.

दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

आरोपी विशाल ठाकूर व कुलवींदरसिंग यांना दिल्लीहून नागपुरात आणण्यात आले. अशी माहिती सायबर सेलचे नितीन फटांगले यांनी दिली. नागपुरातील न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, हे तपासण्याचे काम सुरू आहे. हे दोघेच आरोपी होते की, आणखी कुणी आहेत, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. पण, सायबर पोलिसांनी तांत्रीक तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या एवढे मात्र खरे.

Nagpur Crime | ससेगावात गावठी बॉम्बचा स्फोट, तीन जणांच्या डोळ्यात गेली माती, काय आहे प्रकरण? 

Honey Singh | रॅप गायक हनीसिंगला सत्र न्यायालयाचा दणका, पाचपावली पोलीस ठाण्यात यावचं लागणार?

Nagpur Crime | विदर्भात पुन्हा बहेलिया शिकाऱ्यांचा शिरकाव?, दोन बिबटे जाळ्यात अडकल्याने चिंता वाढली

Follow Us
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....