Nagpur Tourism | गिरड रस्ता रुंदीकरणास वनविभागाची आडकाठी!; पर्यटन सुकर होण्यासाठी काय करणार?

| Updated on: Jan 23, 2022 | 4:46 PM

झुडपी जंगलाबाबत केंद्र शासनास तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले. गिरड दर्गा रस्ता रुंदीकरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

Nagpur Tourism | गिरड रस्ता रुंदीकरणास वनविभागाची आडकाठी!; पर्यटन सुकर होण्यासाठी काय करणार?
बैठकीत मार्गदर्शन करताना सुनील केदार
Follow us on

नागपूर : पर्यटनाच्या दृष्टीने गिरड दर्गा परिसर महत्वाचा आहे. या दर्गाकडे गिरडपासून जाणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणात झुडपी जंगल (Shrub Forest) येत आहे. त्यामुळं त्याबाबत स्वयंपूर्ण प्रस्ताव वनविभागाला तातडीने सादर करावा. केंद्र सरकारकडे (Central Government) त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. गिरड ते गिरड दर्गापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाच्या प्रस्तावाबाबत विशेष आढावा बैठकीचे आयोजन दि. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

भाविकांची गैरसोय होता कामा नये

नागपूर महानगर प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, वर्ध्याचे उपवन संरक्षक श्री. शेपट, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री. पेंदे, आर्किटेक्चर भिवगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता शुभम गुंडतवार, गिरड दर्गाचे श्री. काजी, सरपंच श्री. नौकरकर यावेळी उपस्थित होते. गिरड येथील सामाजिक सभागृहाच्या कामात वनविभागाची जागा येत आहे. त्याबाबत चर्चा करुन तत्काळ बांधकामाच्या कामास गती द्यावी. गिरड हे पर्यटन क्षेत्र असून लाखो श्रध्दाळू येथे येतात. पर्यटक व भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही केदार यांनी सांगितले.

रस्त्याच्या दुतर्फा कडूनिंबाची झाडे लावा

वनहक्काबाबत असलेल्या या प्रस्तावास वन विभागाला सोयीस्कर होणार असे मुद्दे त्यात नमूद करा. जमिनीची धूप होणार नाही याबाबत रस्ता रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला निंब वृक्षाची लागवड करा. पर्यावरण रक्षणासाठी रस्ता रंदीकरण करताना उपाययोजना म्हणून या परिसरातील वृक्षांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी वन विभागाकडे सोपवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस वन, सार्वजनिक बांधकाम विभाग, गिरड दर्ग्याचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

MPSC | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला!, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय?

Chandrapur Thermal Power | चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मोठी कारवाई; राष्ट्रीय हरित लवादाने घेतली तक्रारीची दखल, प्रकरण काय?

Nagpur Zero | एका शून्याचं महत्त्व! एक शून्य अतिरिक्त पडला नि कोट्यवधी रुपये खात्यात जमा; नेमकं प्रकरण काय?