Gondia Crime | विदर्भात घरफोडी करून घातला होता धुमाकुळ; पोलिसांनी टोळीला कसे केले जेरबंद?

चोरी करणारे कितीही शातीर असले तर एक ना एक दिवस अडकतातच. विदर्भात घरफोडी करून गेले काही दिवस एका टोळीनं बेजार केले होते. अशाच तीन जणांच्या गँगच्या अर्जुनी मोरगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Gondia Crime | विदर्भात घरफोडी करून घातला होता धुमाकुळ; पोलिसांनी टोळीला कसे केले जेरबंद?
चोरट्यांच्या टोळीला अटक करणारे पोलीस.
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 3:53 PM

गोंदिया : संपूर्ण विदर्भात (Vidarbha) धुमाकुळ घालणारी अट्टल घरफोडी (burglary) करणारी गँग पकडण्यात पोलिसांना यश आलंय. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव (Morgaon Arjuni ) पोलिसांनी तीन आरोपीला अटक केली. या प्रकरणी वडसा येथील फरदिन राजीक शेख राजुरा येथील सचिन संतोष नगराळे व वडसा येथील विकास शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. गेले काही दिवस विदर्भात घरफोडी होत होती. पोलिसांसमोर या चोरांचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान होते. आरोपी पोलिसांना चकमा देत होते. पोलीसही त्यांच्या मागावर होते. पण, ते काही हाती लागत नव्हते. अखेर अशा तीन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

दुर्गमधून आवळल्या मुसक्या

16 जानेवारी रोजी पहाटे अर्जुनी-मोरगाव येथील ज्ञानेश्वर पांडुरंग शहरे यांच्या घरी कोणच नव्हते. आरोपींनी घरफोडी, चोरी करून त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. एक 43 इंची कलर टीव्ही चोरून नेला होता. अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी घटनास्थळावरून माहिती गोळा केली. मिळालेले भौतिक पुरावे, गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढली. तांत्रिक व शास्त्रीय माहितीच्या आधारे सर्व तीन आरोपींना शोधून काढले. फरदिन राजीक शेख, सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे व विकास शर्मा यांचा शोध घेतला. छत्तीसगडच्या दुर्गमधून अटक केली आहे. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक पल्सर टू ट्वेंटी मोटरसायकल व टीव्ही जप्त करण्यात आलेली आहे. या आरोपींकडून विदर्भातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तपास केल्यानंतर हळूहळू त्यांनी केलेले कारनामे समोर येतील. हे चोरटे शातीर असल्यानं परराज्यात निघून गेले होते. पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवले. योग्य वेळ मिळताच त्यांना अटक केली.

दुचाकी अपघातात दोघे गंभीर

दुसऱ्या घटनेत, पवनी-लाखांदूर मार्गावरून दुचाकीने मोहरना आपल्या स्वगावाकडे सुसाट वेगाने जात असलेल्या युवकाने एका सायकलस्वारास धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. मोहरणा येथील रोहित पुंडलिक राऊत हा विरली (बु) वरून बजाज पल्सरने मोहरणा येथे जात होता. करांडला बसस्थानकाजवळ आत्मा पिलारे या सायकलस्वारास मागेहून जबर धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मोटारसायकलस्वार रोहित राऊत याच्या डोक्याला जबर मार आहे. त्यास तात्काळ विरली (बु). येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सायकलस्वार आत्मा पिलारे यास लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

MPSC | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला!, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय?

Chandrapur Thermal Power | चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मोठी कारवाई; राष्ट्रीय हरित लवादाने घेतली तक्रारीची दखल, प्रकरण काय?

Nagpur Zero | एका शून्याचं महत्त्व! एक शून्य अतिरिक्त पडला नि कोट्यवधी रुपये खात्यात जमा; नेमकं प्रकरण काय?

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.